आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

शनिवार, 28 डिसेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती व्याघात नावाचा एक अशुभ योग तयार करत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. या अशुभ योगाचा प्रभाव 12 पैकी 6 राशींच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. इतर 6  राशींसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • मेष: शुभ रंग : लाल | अंक : ५

कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.

 • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८

उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात मन रमेल.

 • मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ६

आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. 

 • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

 • सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३

अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.

 • कन्या : शुभ रंग : निळा | अंक : २

प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील. 

 • तूळ: शुभ रंग : मोतिया | अंक : ९

कष्टांचाही अतिरेक करू नका. ध्येयाच्या मागे धावताना तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.

 • वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ४

काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. अाज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

 • धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ५

धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून राहता येईल. 

 • मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : १

आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

 • कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

बेरोजगारांनी रोजगारासाठी  दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.  

 • मीन : शुभ रंग : केशरी | अंक : ४

प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस. 

बातम्या आणखी आहेत...