आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 2 नोव्हेंबर 2019 ची ग्रहस्थिती आणि पुर्वाषाढा नक्षत्र सौभाग्य आणि शोभन नावाचे 2 शुभ योग तयार करत आहेत. याच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशींचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त सहा राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो.   

मेष: शुभ रंग : आकाशी | अंक :२                      
 
व्यावसायिकांना व्यापार वृध्दीसाठी प्रवास करावे लागतील. नोकरदारांना साहेबांना खूष करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल. दानधर्म कराल.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ३                                                
 
कार्यक्षेत्रात थोड्याफार अडचणींचा सामना करावा लागेल. भागिदारी व्यवसायात काही मतभेद संभवतात.आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा व वाहन हळू चालवा.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६                                                                      
 
महत्वाच्या वाटाघाटी यशस्वी होतील. योग्यवेळी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. तु म्हणशील तसंच या धोरणाने वैवाहीक जिवनांतील आनंद वाढेल.



कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक : २  
 
कार्यक्षेत्रात प्रगती पथावरुन तुमची वाटचाल सुरू आहे. हितशत्रूंवर मात्र नजर ठेवा. आज दुपारनंतर जरा तब्येत नरम राहील. योग्य सल्ला घ्या.      



सिंह : शुभ रंग : तांबूस | अंक : १      
                                                 
खिसे भरलेले असतील तरी दुपारनंतर रिकामे व्हायला वेळ लागणार नाही. आवक पुरेशी असली तरही खर्चावर ताबा गरजेचा आहे. आज प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.    
                                                                                                   

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९                                
 
काही कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी वेळ काढाल.आज प्रिय व्यक्तीस दिलेला शब्द पाळावा लागेल. आज  मुलांचेही लाड आनंदाने पुरवाल. छान दिवस.



तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७    
 
व्यावसायिक उद्दीष्ठे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. योग्य जाहिरातीवरही लक्ष देणे गरजेचे. गप्पांत वेळ दवडून चालणार नाही.    



वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८
 
काही अनुकूल घटनांनी तुमचं मनोबल वाढेल.काही अनपेक्षित लाभ होतील. नेते मंडळींची भाषणे प्रभावी होतील. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवलेले बरे.  



धनू :  शुभ रंग : भगवा | अंक :
 
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. सभासंमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल. आज वादविदात स्वत:च्या मताशी ठाम रहाल.  



मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ५                                                
 
आर्थिक प्रश्न थोडे बिकट होण्याची शक्यता आहे. दूरचे नातलग संपर्कात येतील. आपल्या स्पष्टवक्तेपणा मुळे कुणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.



कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
 
महत्वाकांक्षी उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील. अधिकार वापरताना संकोच बाळगू नये.



मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३
 
आज तुम्हाला निस्वार्थीपणे काही कंटाळवाणी कामेही करावी लागणार आहेत. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. काही प्रसंगी अहंकाराची बाधा होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...