आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार 30 नोव्हेंबर रोजी पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. शनियावरच्या या अशुभ योगामुळे 6 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील...
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
नाेकरदारांना वरीष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागणार आहे. कुणावरही विसंबून राहू नका. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दिवस कष्टांचा.
हाताखालची माणसे बंंड पुकारतील. गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. आज ज्येष्ठांना मानसिक शांती नामस्मरणातून मिळेल. गृहीणी दानधर्म करतील.
आज काही मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागणार आहे. दिवस तितकासा अनुकूल नसल्याने जरा संयमाची गरज आहे. मोफत सल्ले देऊ नका.
आपल्या वक्तृत्वाने समोरच्यास प्रभावित कराल.काही चांगल्या घटनांनी तुमचे मनोबल वाढणार आहे. जोडीदारास एखादे सरप्राईझ गिफ्ट द्याल.
काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.तब्येतीच्या काही करकोळ तक्रारी उद्भवतील. वेळीच डाँक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायात भिडस्तपणा नको.
परिवारात स्वछंदी वातावरण राहील. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. आज प्रिय व्यक्तींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.
घरगुती समस्यांवर योग्य मार्ग मिळाल्याने निश्चिंत असाल. आवडत्या छंदास वेळ द्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. प्रेमी युगुलांना ग्रीन सिग्नल.
महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.दगदग वाढेल. बेरोजगारांना आपल्या परिसरातच रोजगाराची संधी मिळेल. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.
पैसा येण्याचे विविध मार्ग उपलब्ध होतील. काही रखडलेली देणी देता येतील. वाणीत गोडवा ठेवून इतरांकडून कामे करून घेता येतील. आशादायी दिवस.
चैनीसाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. अधुनिक राहणीमानास प्राधान्य द्याल. आज वादविवादात आपल्याच मताशी ठाम रहाल. शब्द जपूनच वापरा.
आज भविष्याच्या दृष्टीने काहीसे चिंतीत असाल. सुरक्षित गुंतवणूकीकडे तुमचा कल राहील. नवोदीत कलाकार नावारूपास येतील. थोरांशी मतभेद होतील.
तुमचे कार्यक्षेत्रातील वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी बढतीचे मार्ग खुले हाेतील. आज तुम्ही गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. उच्चशिक्षीतांच्या अपेक्षा वाढतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.