आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 5 ऑक्टोबर 2019 ला मूळ नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
 

मेष: शुभ रंग : तांबूस | अंक : १
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणेही गरजेचे आहे. विश्रांतीही महत्वाची. 

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ६ 
नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील. 


कर्क :  शुभ रंग : क्रिम | अं
क : ३
कोणताही गोष्ट सहज साध्य नसली तरी तुमचे  प्रामाणिक  प्रयत्न  कारणी लागतील. काही येणी वसूल होण्याची शक्यता आहे. तब्येतीस मात्र जपा.                 

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : २
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही. 

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.   

तूळ : शुभ रंग : पिवळा| अंक : ४
आज जास्त वेळ मित्रांच्या सहवासात रमाल.कामानिमित्त केलेले प्रवास कार्यसाधक होतील. आज काही घरगुती समस्यांवरही लक्ष केंद्रीत करावे         

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
पैशाअभावी राहीलेली अपूरी स्वप्ने पूर्ण करू शकाल.तुमच्या हसतमुख स्वभावामुळे इतरांना तुमचा सहवास आवडेल. आज शक्यतो प्रवासाची दगदग टाळा.     


धनू :  शुभ रंग : जांभळा | अंक
: ५
व्यावसायिक  मंडळी वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी सक्षम असतील. गुणवत्तेबराेबर  जाहीराती वर ही भर द्यावा लागणार आहे. अविश्रांत परिश्रमांना पर्याय नाही. 

मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८    
आपला स्वार्थ  साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. 

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. आवक बाजू भक्कम असेल. आपले हक्क लढून मिळवाल.   

बातम्या आणखी आहेत...