Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस

रिलिजन डेस्क | Update - Apr 06, 2019, 12:00 AM IST

आज गुढीपाडवा राशिफळ : मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील शनिवार, कर्क राशीच्या लोकांना अधिकाराचा गैरवापर पडू शकतो महाग

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  आज शनिवार 6 एप्रिल 2019 पासून हिंदू नववर्ष म्हणजे नवीन संवत्सर सुरु होत आहे. यासोबतच चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे. या संवत्सरचे नाव परिधावी आहे. स्वामी इंद्राग्नी राहतील. नवीन वर्षाचा राजा शनी आणि मंत्री सूर्यदेव राहतील. आजचा दिवस बहुतांश राशीच्या लोकांसाठी खास राहील. नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस खास आहे.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  मेष : आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.  शुभ रंग : केशरी  | अंक : १

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  वृषभ : नवीन उद्योजकांनी मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली कराव्यात. अती आक्रमकतेने निराशाच पदरात पडण्याची शक्यता आहे. थोर मंडळींचे  अनुभवाचे बोल ऐकून घ्यायला हरकत नाही.   शुभ रंग: पिवळा|अंक:४   

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  मिथुन : आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल. शुभ रंग : हिरवा | अंक : ५

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  कर्क : आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील. शुभ रंग : क्रिम | अंक : ३

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  सिंह : नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ 

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  कन्या : कार्यक्षेत्रातील काही मनाविरुध्द घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. शुभ रंग : पांढरा | अंक : ७

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  तूळ : व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  वृश्चिक : वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा. शुभ रंग : भगवा | अंक : ३

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  धनू :  सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस. शुभ रंग : मोतिया | अंक : ८

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  मकर : आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील. शुभ रंग : मरून  | अंक : ९

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  कुंभ : आज कंटाळवाणा दिवस. दैनंदीन क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना शेजारधर्म जपावा लागेल. शुभ रंग : डाळिंबी  | अंक : २

 • Saturday 6 April 2019 horoscope in Marathi

  मीन : आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. शुभ रंग : चंदेरी  | अंक : ७

Trending