Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

आज शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या आठवड्यातील पहिला शनिवार कसा राहील तुमच्यासाठी

दिव्य मराठी

Jul 06,2019 12:25:00 AM IST

शनिवार 6 जुलै रोजी सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे धनलाभाचे योग जुळून येत आहेत. मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. सिद्धी योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. नवीन कामाची आखणी कराल. अडकली कामे पूर्ण होतील. काही लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील.हौसमौज करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. मित्रमै़त्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.वृषभ : शुभ रंग : तांबडा | अंक : १ बराच काळ रखडलेल्या घरगुती कामांसाठी वेळ काढावा लागेल. मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावेच लागणार आहे. वाहन खरेदीची कामे मार्गी लागतील.मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ३ आज एखाद्या महत्वाच्या कामासाठी भटकंती करावी लागेल. बराच वेळ घराबाहेरच जाईल. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवा. वादविवाद टाळावेत.कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७ उद्योग व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. इतरांना दिलेले शब्द पाळू शकाल. प्रवासात आपल्या वस्तूंची काळजी घ्या.सिंह : शुभ रंग :जांभळा |अंक : २ आज केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारूच नका. मागून नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा. आज तुमची तब्येत जरा नरमच राहील.कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९ कंजूषपणा बाजूला ठेऊन आज काही अवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील, सतर्क रहा. मित्रांना पार्टी आज नको.तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६ आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ आज रिकामटेकडया गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल.धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ८ काही क्षुल्लक अडचणींनी नैराश्य येण्याची शक्यता आहे. घरातल्या थोर मंडळींचेही उपदेश ऐकून बोअर व्हाल. आज तुम्हाला एकांताची गरज भासेल.मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ मनाच्या द्विधा अवस्थेत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. विरोधकांना व स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. धाडसाची कामे टाळा.कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ आज व्यवसायातील आर्थिक उलाढाली भागिदारांना विश्वासात घेऊनच करा. वैवाहीक जिवनांत गोडवा असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल.मीन : शुभ रंग : मरून | अंक : १ नोकरीच्या ठीकाणी हितशत्रूंचा उपद्रव वाढलेला जाणवेल. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. तरूणांनी कुसंगत टाळावी. व्यसने घात करतील.
X