आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शनिवार, 7 डिसेंबर रोजी रेवती नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : भगवा | अंक : ३

आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे याेग अटळ आहेत. प्रवासात नव्या ओळखी होतील.    

  • वृषभ: शुभ रंग : माेरपंखी | अंक : ७

आज तुमचा उंची राहणीमाकडे कल राहील. काही प्रतिष्ठीतांचा सहवास लाभल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज मित्रांमधे तुमच्या शब्दाला वजन राहील. 

  • मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : १

केवळ स्वप्नरंजनापेक्षा आज तुम्ही कृतीस अधिक प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांवर अंकूश राहील. नेते मंडळींचा जनमानसांवर प्रभाव राहील.

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

घरातील थोरांचे हट्ट पुरवावे लागतील. उद्योग व्यसायात काही तणावांना सामोरे जावे लागेल. ज्येष्ठ मंडळींनी घरात फार लक्ष न घालता नातवंडांत रमणेच हिताचे.                                            

  • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

आज फार दुनियादारी नको, फक्त आपल्या स्वाथार्वर लक्ष केंद्रीत करा. मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. वाहन चालवताना जपून बरं का.

  • कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : २

काही मनाजोगत्या घटनांनी वैवाहीक जिवनांत बहार येईल. कार्यक्षेत्रात नव्या योजना राबवता येतील. गृहीणी चार चौघीत झालेल्या कौतुकाने भारावून जातील.                                        

  • तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ५

नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.कुणाकडेही सल्ले न मागता फक्त आपल्या मनाचा कौल घ्या. गृहीणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी.

  • वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ९

आवडते छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढाल.पैशाची कमतरता जाणवणार नाही. नवोदीत कलाकारांच्या प्रयत्नांस यश येईल. संधी मिळतील.

  • धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३

पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. नोकरीच्या ठीकाणी बदलीचे समाचार येतील. महत्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवा.

  • कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : १

व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होईल. तुम्ही गरजूंस मदत करायला तत्पर असाल. मृदु वाणीने सर्वांना आपलेसे कराल. 

  • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

आज हातचे सोडून पळत्या मागे धावणे हिताचे ठरणार नाही. क्रोधावर ताबा गरजेचा. उतावीळपणे घेतलेले निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे.