आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शनिवार 7 मार्चची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती अतिगंड नावाचा अशुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे सहा राशीच्या लोकांची कामे बिघडू शकतात. हा अशुभ योग टेन्शन, खर्च आणि नुकसान वाढवतो. याचा अशुभ प्रभाव आरोग्यावरही पडू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : आकाशी| अंक : ८

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

  • वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.

  • मिथुन : शुभ रंग : तांबडा| अंक : ९

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे. 

  • कर्क : शुभ रंग : भगवा | अंक : ७

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.

  • सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

  • कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस. 

  • तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

  • वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको. 

  • धनू : शुभ रंग : अबोली | अंक : ५

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत. 

  • मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

  • कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ४

नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.

  • मीन : शुभ रंग : पिवळा | अंक : ६

हौशी मंडळींना आज  जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

बातम्या आणखी आहेत...