आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saturday 8 February 2020 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून आजच्या दिवशी पुष्य नक्षत्रामुळे आयुष्मान नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाइफमध्ये काहीतरी नवीन घडेल आणि संबंध सुधारतील. काही राशींवर ग्रहांचा चांगला प्रभाव असल्यामुळे शनिवारी धनलाभ होण्याची शक्यता राहील. इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ३

आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे.

  • वृषभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी|अंक : १

व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना तत्परतेने मदत कराल.

  • कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९

तुमच्या वागण्यात इरांना हट्टीपणा जाणवेल. स्वत:चेच  खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. तुमच्याकडून घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

  • सिंह : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ८

काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. आपल्या बोलण्याने कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

  • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत शब्दास मान राहील.

  • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल.नोकरीत काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करील. ध्येय साध्य होतील.

  • वृश्चिक : शुभ रंग : मरून | अंक : ७

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळणार अहे. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यंना उपासनेचे फळ मिळेल. काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल.

  • धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा.

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : १

आज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

  • कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

काही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.

  • मीन : शुभ रंग : क्रिम | अंक : २

पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावा.