Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 08, 2019, 12:05 AM IST

शनिवार राशिफळ : दिवसाची सुरुवात होत आहे अशुभ योगात, 12 पैकी या 6 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहण्याची आहे आवश्यकता...धावपळ आणि धनहानीची शक्यता...

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    शनिवार 08 जून रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : नारिंगी | अंक : २
    राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण सुरु असताना आज पैशाची कमतरता पडणार नाही. घर सजावटीसाठी खर्च कराल काैटुंबिक सदस्यांत सलोखा व सामंजस्य असेल.  

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ५
    कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हीताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    मकर : शुभ रंग : अबोली | अंक : ७
    आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस.    

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३                                   उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. आनंदी दिवस.    

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६
    नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी अश्वासने देतील.कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ३ 
    अध्यात्मिक  मार्गात  प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.  

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    कर्क :  शुभ रंग : जांभळा | अंक : ४
    आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रूसवे फुगवे चालायचेच.   

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    धनू :  शुभ रंग : भगवा | अंक : ७
    भागिदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.   

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
    दैनंदीन कामे सुरळीत पार पडणार आहेत. दिवस लाभाचा असल्याने व्यवसायात एखादे धाडस करायला हरकत नाही. आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला मान राहील.    

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ६   
    कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.     

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : शुभ रंग : तांबूस | अंक : १
    अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतीहुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा. 

  • saturday 8 june 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
    व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकूश ठेवावा लागेल. मानसिक  शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही. 

Trending