Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Feb 09, 2019, 12:00 AM IST

शनिवार राशिफळ : सिद्ध योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात 12 पैकी या 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, जाणून घ्या, तुमच

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    शनिवार, 9 फेब्रुवारीला माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज उत्तर भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना बिझनेस, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. या व्यतिरिक्त इतर 4 राशीच्या लोकांसाठी शनिवार शुक्रवार संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    मेष : व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील. शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    वृषभ : अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. घर खरेदी, वाहन खरेदी सारखी स्वप्ने साकार होणार आहेत. आज अती प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शुभ रंग : मोतिया | अंक : २ 

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    मिथुन : आज फक्त आपण व आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्वाच्या असतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास राहील. शुभ रंग : आकाशी | अंक : ७

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    कर्क : नोकरदारांनी आज  वरीष्ठांच्या होला हो करून दिवस ढकलावा. अती खोलात शिरल्याने अडचणी वाढतील.आज वडीलधारी मडळी तुमच्या हिताचेच सल्ले देतील. शुभ रंग : हिरवा | अंक : ८

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    सिंह : कार्यक्षेत्रात काही कटकटींना तोंड द्यावे लागणार आहे.नोकरीत अधिकाऱ्यांच्या  दडपणाखाली काम करावे लागेल. आज तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या. शुभ रंग : लाल | अंक : ५

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    कन्या : वैवाहीक जिवनांत जोडीदाराशी चांगले सुर जुळतील. काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आज स्वार्थ साधण्यासाठी काही कामे निस्वार्थीपणे करावी लागतील. शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    तूळ : ध्येय प्राप्तीची ओढ लागेल परंतू तब्येतीकडे दुर्लक्ष महागात पडेल. आज मातुल घराण्याकडून काही महत्वाचे समाचार येतील. येणी वसूल होण्याची शक्यता. शुभ रंग : राखाडी | अंक : २

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    वृश्चिक : फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. नीतीमत्तेचे भान गरजेचे. शुभ रंग : स्ट्रॉबेरी  | अंक : ६

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    धनू : सामाजिक कार्य बाजूला ठेऊन आज कुटुंबास कसा वेळ देता येईल ते बघावे लागेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष  द्यावे लागणार आहे. गृहीणींसाठी व्यस्त दिवस. शुभ रंग : निळा | अंक : ३

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    मकर : काही कौटुंबिक कटकटींना तोंड द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील. झाकली मुठ झाकलीच ठेवा. शुभ रंग : आकाशी | अंक : ७

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    कुंभ : आपल्या कतृत्वास पाठींबा देणारी माणसे भेटतील. आज गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे करून घ्याल. पैशाची आवक पुरेशी असल्याने थोडीफर चैनही कराल. शुभ रंग : पांढरा | अंक : १

  • Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi

    मीन : खर्चाचे प्रमण वाढले तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. घरगुती वादात थोरांच्या वयाचा मान राखावा लागेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : ५

Trending