आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर-कुंभ राशीचे स्वामी आहेत शनिदेव, या ग्रहाला 12 राशींचे चक्र पूर्ण कारणासाठी लागतात 30 वर्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या महिन्यात शनीचे राशी परिवर्तन होत आहे. ज्योतिष दृष्टिकोनातून हे अत्यंत खास राशी परिवर्तन आहे. कारण नऊ ग्रहांमध्ये शनी सर्वात हळू-हळू चालणार ग्रह आहे. या ग्रहाला 12 राशींचे चक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्ष लागतात. शनि एका राशीमध्ये जवळपास अडीच वर्ष राहतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, शनीशी संबंधित काही खास गोष्टी...

  • मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत शनिदेव

पं. शर्मा यांच्यानुसार शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. जवळपास 29 जानेवारीच्या रात्री शनिदेव धनु राशीतून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहेत. स्वतःच्या राशीमध्ये शनिदेव बलवान आणि प्रभावशाली होतात. शनिदेवाला न्यायाधीश मानण्यात आले आहे. हा ग्रह आपल्या चांगल्या-वाईट कर्मानुसार फळ प्रदान करतो.

  • साडेसाती आणि ढय्याची स्थिती

मकर राशीमध्ये शनि आल्यामुळे वृषभ आणि कन्या राशीवरील ढय्या समाप्त होईल. वृश्चिक राशीची साडेसाती समाप्त होईल आणि कुंभ राशीवर साडेसातीचा प्रथम ढय्या चालू होईल. मकर राशीवर दुसरा आणि धनु राशीवर तिसरा ढय्या सुरु होईल. यावेळी शनि संपूर्ण अडीच वर्ष मकर राशीमध्ये राहील. याच राशीमध्ये शनि वक्री होईल परंतु राशी बदलणार नाही. 11 मे पासून 28 सप्टेंबरपर्यंत शनि वक्री राहील.

  • शनिदेवासाठी काय करावे आणि काय करू नये

शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक शनिवारी ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा. हनुमान, महादेव आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा करावी. घरातील मोठ्या लोकांचा सन्मान करावा. चुकूनही वृद्ध लोकांचा अनादर करू नये. तीळ, तेल, काळे वस्त्र दान करावेत. प्रत्येक शनिवारी शनिदेवासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. फसवणूक केल्यास नुकसान सहन करावे लागू शकते.

  • सर्व राशींवर शनीचा प्रभाव कसा राहील

मेष - प्रतिष्ठा वाढेल, वृषभ - शुभ, मिथुन - हानीचे योग, कर्क - शुभ, सिंह - रोगांमध्ये वृद्धी, कन्या - शुभ, तूळ - मानसिक तणाव, वृश्चिक - सुख वाढेल, धनु - शुभ, मकर - शुभ, कुंभ -व्यय अधिक, मीन - शुभ

बातम्या आणखी आहेत...