Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | saturn-spiritual-life

शनीदेवतेसाठी मंदिरात पादत्राणे का सोडली जातात?

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 12:14 PM IST

खूप माणसं शनी मंदिरात आपली पादत्राणे सोडून जातात आणि त्याला शुभ मानतात.

  • saturn-spiritual-life

    खूप माणसं शनी मंदिरात आपली पादत्राणे सोडून जातात आणि त्याला शुभ मानतात. शनिवारी शनीच्या मंदिरात पादत्राणे सोडून गेल्यावर काय फायदा होतो? चामड्याची पादत्राणे सोडून गेल्यावर जीवनातील सर्व समस्या त्याबरोबर दूर होतात? वास्तविकपणे हा समज ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला क्रूर आणि कठोर न्यायप्रिय ग्रह मानलं गेलंय. शनी जर एखाद्या व्यक्तीवर संतुष्ट नसेल, तर त्याला खूप प्रयत्नांनंतरही अपेक्षित फळ मिळत नाही. ज्याची साडेसाती सुरू आहे किंवा ज्यांच्या राशीमध्ये शनी चांगल्या स्थानात नाही त्यांना आयुष्यभर समस्यांना तोंड द्यावे लागते.


    शनिवार हा शनीचा दिवस मानला जातो. आपल्या शरीरातील विविध भागही ग्रहांनी प्रभावित झालेले असतात. त्वचा आणि पायांमध्ये शनीचा प्रभाव असतो, असे मानले जाते. त्यामुळे त्याच्याशी संबंधित वस्तू शनिला दान केल्या जातात. चामडं आणि पाय हे दोन्ही शनीच्या प्रभावाखाली असतात. त्यामुळे शनिवारी मंदिरातून आपली पादत्राणे चोरीला गेली तर जीवनातील समस्या पुढील काळात कमी होत जातील, असे मानले जाते. शनीच्या नाराजीमुळे आता जास्त त्रास होणार नाही, असे मानले जाते. याच कारणामुळे अनेक लोक शनिवारी शनी मंदिरात आपली चमड्याची पादत्राणे सोडून जातात.

Trending