आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या सत्यजित बच्छावने सर्वाधिक बळी घेत गाजवली टी-२० स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट डेस्क  इंदूर येथे बीसीसीआयच्या वतीने मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नाशिकचा लेफ्ट आर्म लेगस्पिन गोलंदाज सत्यजित बच्छाव सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरी सत्यजितच्या कामगिरीमुळे देशपातळीवरील सत्यजितची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. रणजी, प्रथम श्रेणी एकदिवसीय तसेच टी-२० स्पर्धेत मैदान गाजवणाऱ्या सत्यजितमुळे क्रीडा क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 


रणजी ट्रॉफीचे सामने पार पडल्यानंतर बीसीसीआयच्या वतीने मुश्ताक अली टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या सुपर लीग अ गटात ५ संघ तर सुपर लीग ५ संघाचा समावेश आहे.भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणा ऱ्या खेळांडूसह रणजीमध्ये चमकदार कामगिरी करणारे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धंात सुरुवातीपासून महाराष्ट्राच्या संघाची कामगिरी उत्कृष्ट ठरली हेाती. या कामगिरी मागे महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणारा नाशिकचा सत्यजित बच्छावने लेफ्ट आर्म लेग स्पिन गोलदांजीद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.सत्यजितने या स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये २० बळी घेत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलदांज ठरला आहे. या कामगिरीमुळे देशपातळीवर रंगत असलेल्या या स्पर्धेत सत्यजितच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे. याचमुळे किक्रेट विश्वात नाशिक शहराचे नाव पुन्हा एकदा उंचावले गेले आहे. 


स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये केले महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व. अव्वल कामगिरीतून मिळवले शानदार २० बळी. या सरस कामगिरीतून ठरला स्पर्धेत अव्वल गाेलंदाज 

 

आयपीयएमध्येही मिळू शकते संधी 
यंदाच्या आयपीएलसाठी खेळाडूंच्या झालेल्या लिलावामध्ये सत्यजित अनसोल्ड राहिला होता. मात्र मुश्ताक अली टी २० स्पर्धेेत त्याच्या या कामगिरीची दखल घेत आयपीएलचे दरवाजे सत्यजितसाठी उघडले जावू शकतात. 


एक वेगळीच आनंदाची बाब 
मुश्ताक अली टी २० स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळतांना सर्वाधिक बळी घेतल्याचा एक वेगळाच आनंद आहे. अशीच कामगिरी कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक सराव करण्यावर भर देणार आहे. -सत्यजीत बच्छाव,क्रिकेटपटू 


नाशिकसाठी अभिमानास्पद बाब 
मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेेत सत्यजितची कामगिरी ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहेच. या कामगिरीमुळे स्थानिक खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळले. -समिर खरकटे, सचिव, एनडीसीए 
 

बातम्या आणखी आहेत...