ड्रोन हल्ला / सौदी अरेबिया : जगातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोवर ड्रोन हल्ला

अरामको एका दिवसात 70 लाख बॅरल क्रूड प्रोसेस करते

Sep 14,2019 02:56:00 PM IST

रियाध : जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी अरामकोच्या दोन फॅसिलिटी सेंटर्सवर ड्रोन हल्ले करण्यात आले. हे दोन्ही सेंटर्स ‘अबकॅक’ आणि ‘खुराइस’ येथे स्थित आहेत. सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने ही माहिती दिली. हल्ल्याची बातमी सर्वात पहिले दुबईच्या अल-अरबिया चॅनलने दिली. चॅनलनेच नंतर आगीवर निंतरण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगितले.


दररोज 70 लाख बॅरल क्रूड ऑइलचे प्रोसेसिंग
अरामकोचा जगामध्ये सर्वात मोठा क्रूड ऑइल प्लांट आहे. याठिकाणी खराब गुणवत्ता असलेले ऑइल स्वीट क्रूडमध्ये बदलले जाते. त्यानंतर हे ऑइल विदेशात निर्यात करण्यासाठी फारसची खाडी आणि लाल सागर येथे पाठवले जाते. अरामको एका दिवसात 70 लाख बॅरल क्रूड प्रोसेस करते.

X