आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Saudi Arabia Is The World's First Sports City To Spend Rs 37 Lakh Crore; Islamic Law Does Not Apply Here

सौदी अरेबियात ३७ लाख कोटींच्या खर्चातून साकारते आहे जगातील पहिली स्पोर्ट्स सिटी; येथे इस्लामी कायदा लागू नसेल

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

रियाध, लंडन - सौदी अरेबियात ३७ लाख कोटी रुपयांच्या खर्चातून जगातील पहिली क्रीडानगरी अर्थात स्पोर्ट्स सिटी उभी राहत आहे. सौदीचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान यांच्या व्हिजन २०३० चा हा एक भाग आहे. यानुसार, सौदी अरेबियाला क्रीडाविश्वातील जागतिक केंद्र बनवण्यात येणार आहे. लाल समुद्राच्या किनारी उभ्या राहत असलेल्या या स्पोर्ट॰स सिटीत इस्लामी कायदे लागू नसतील. येथे पाश्चिमात्य देशांप्रमाणे नियम-कायदे लागू असतील. येथे येणाऱ्या क्रीडाप्रेमी, महिला आणि कर्मचाऱ्यांना दारू पिण्याची मुभा असेल. एवढेच नव्हे तर ते येथे मोकळेपणाने हिंडू-फिरू शकतील. त्यांच्यावर इस्लामी कायद्याचे पालन करण्याचा दबाव नसेल. या नगरीचे नाव ‘नेओम’ असे ठेवण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा २०२५ मध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पाची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, राजपुत्राच्या व्हिजन २०३० अंतर्गत तेलावर अवलंबित्व असलेल्या देशात सामाजिक आणि आर्थिक बदलाचे पर्व सुरू झाले आहे. त्यानुसार अनेक नवे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार खेळाशी संबंधित अनेक मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे प्रस्ताव तयार करण्यात आले. या निर्णयानुसार येत्या शनिवारी रियाधमध्ये अँटोनी जोशुआ आणि अँडी रुज ज्युनियर यांच्यात बॉक्सिंगचा सामना ठेवण्यात आला आहे. यासाठी ४७२० कोटी रुपयांचे पुरस्कार आहेत. मात्र, हा सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांना तसे स्वातंत्र्य मिळणार नाही, जसे नेओम झाल्यानंतर मिळेल. येथे खेळाच्या माध्यमातून  पर्यटनास चालना देण्यासाठी पुढील वर्षी कोट्यवधी रुपयांच्या पुरस्काराच्या अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतासह ८ भागीदारांशी क्रीडा करार करणार 


सौदी अरेबियाच्या व्हिजन २०३० नुसार धोरणात्मक भागीदारीसाठी ८ देशांची निवड करण्यात आली आहे. यात भारतही आहे. सौदीचे क्रीडामंत्री राजपुत्र अब्दुल अजीज बिन तुर्की अल फैसल यांच्या मते, आम्ही धोरणात्मक भागीदारांशी द्विपक्षीय करार करणार आहोत. क्रीडा स्पर्धा आणि आयोजनाच्या वाढीशिवाय आम्ही नेओममधील जागतिक दर्जाच्या सुविधा या देशांना उपलब्ध करून देणार आहोत.