आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: जिग्गी मित्रांप्रमाणे भेटले सौदीचे राजकुमार आणि पुतिन; तर भेट घेऊनही ट्रम्प म्हणाले, मी प्रिन्सला बोललोच नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्यूनस आयर्स - अर्जेंटिना येथे जी-20 संमेलनात विविध देशांचे नेते जमले. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल झाला. अमेरिकन दैनिक वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचे आरोप लागल्यानंतर प्रथमच सौदी अरेबियाचे प्रिन्स आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दिसून आले. अमेरिकेसह सर्वच जागतिक नेते त्यांना दुर्लक्षित करतील असे गृहित धरले जात होते. परंतु, पुतिन यांनी प्रिन्स मोहम्मद यांना पाहताच अगदी जिग्गी मित्रांप्रमाणे टाळी दिली आणि हस्तांदोलन केले. त्यांच्या भेटीचा हा क्षण पाहून जणू कित्येक दिवस एकमेकांपासून दूर राहिलेल्या जुन्या मित्रांची अचानक भेट झाली असे वाटत होते. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.


व्लादिमीर पुतिन आणि मोहम्मद बिन सलमान यांनी एकमेकांची भेट घेत असताना सर्वच नेते सभागृहाच्या मुख्य द्वारावर ये-जा करत होते. याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्यांच्या मागून आले. परंतु, त्यांनी या दोघांना डिस्टर्ब न करता निघून जाणेच पसंत केले. या संमेलनात पुतिन आणि प्रिन्स मोहम्मद यांनी द्विपक्षीय व्यापर आणि गुंतवणुकीवर चर्चा केली.

 

WATCH: #Saudi Crown Prince #MohammedbinSalman and #Russia|n President Vladimir #Putin have a friendly chat ahead the start of #G20Argentina Summit

More on our website:https://t.co/ajNOw7MAQp pic.twitter.com/bGsqVEP8ED

— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) November 30, 2018

भेट घेऊन ट्रम्प म्हणाले, मी प्रिन्सला बोललोच नाही...
याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली. खाशोगी यांच्या हत्येनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय शिखर संमेलनात सौदीचे प्रिन्स आले होते. परंतु, त्यांच्याशी आपण एक शब्दही बोललेलो नाही असा दावा ट्रम्प यांनी केला. परंतु, शिखर संमेलन सुरू असताना मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हांका या दोहोंची भेट घेतली. तरीही ते बोलले कसे नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...