Home | International | Pakistan | Saudi Prince's Pak tour

सौदीच्या प्रिन्सचा दोन दिवसांचा पाक दौरा; 5 ट्रकने पोहोचले सामान 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 11:10 AM IST

सलमान येथे येण्याआधीच त्यांच्यासाठी लागणारे सामान घेऊन ५ ट्रक इस्लामाबादेत दाखल झाले आहेत.

  • Saudi Prince's Pak tour

    इस्लामाबाद- सौदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहंमद बिन सलमान या आठवड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर पाकिस्तानला जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांच्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु त्यांच्या दौऱ्यामुळे प्रिन्सच्या स्वागताची पाकिस्तानात जोरात तयारी सुरू आहे.

    ही तयारी सुरू असतानाच सलमान येथे येण्याआधीच त्यांच्यासाठी लागणारे सामान घेऊन ५ ट्रक इस्लामाबादेत दाखल झाले आहेत. या ट्रक्समध्ये सलमान यांच्या व्यायामाची यंत्रे, त्यांचे फर्निचर व काही वैयक्तिक सामान आहे. त्यांचे सुरक्षा पथकही इस्लामाबादेत दाखल झाले आहे.

Trending