आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Saudi Woman Held At Bangkok Claims She Could Be Killed On Return

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौदीतून पळालेल्या तरुणीचे अपील: इस्लाम सोडलाय, घरी पाठवले तर कुटुंबीय मारून टाकतील; मदतीला धावून आल्या मानवाधिकार संघटना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - सौदी अरेबियातून पळालेल्या 18 वर्षीय तरुणीला बँकॉकच्या विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने तिला परत पाठवण्याची तयारी सुरू केली. याच दरम्यान तिने भावनिक अपील सोशल मीडियावर जारी केले. त्यानुसार, कृपा करून सौदीत परत पाठवू नका. तिने इस्लाम सोडला आहे. घरी पाठवल्यास कुटुंबीय ठार मारतील अशी भीती तिने व्यक्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुनून असे नाव असलेली ही तरुणी कुवैतमध्ये आपल्या कुटुंबियांसह सुटी घालवण्यासाठी गेली होती. येथूनच तिने ऑस्ट्रेलियाला पसार होण्याचे ठरवले होते. परंतु, कनेक्टिंग फ्लाइट असल्याने तिला बँकॉकला थांबवण्यात आले आणि याच ठिकाणी प्रशासनाने तिला ताब्यात घेतले. परंतु, आंतरराष्ट्रीय मीडियाने हा मुद्दा लावून धरल्यानंतर थायलंड सरकारला माघार घ्यावी लागली. तसेच संबंधित तरुणीला तिच्या मरजीविरुद्ध कुटुंबियांकडे पाठवणार नाही असे सांगावे लागले.

 

. @rahaf84427714 sent this: “Based on the 1951 Convention and the 1967 Protocol, I'm Rahaf Mohammed, formally seeking refugee status to any country that would protect me from getting harmed or killed due to leaving my religion and torture from my family. #SaveRahaf pic.twitter.com/jJSFBKC8Ka

— Mona Eltahawy (@monaeltahawy) January 7, 2019

 

सोशल मीडियावर मागितली मदत

कुनुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी करून मदत मागितली. तिने सांगितल्याप्रमाणे, तिच्याकडे ऑस्ट्रेलियाचा व्हीसा आहे. तरीही बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर सौदीच्या राजदूत अधिकाऱ्यांनी तिला ताब्यात घेऊन पासपोर्ट/व्हीसा जप्त केला. तर सौदी अधिकाऱ्यांना तिला ताब्यात घेण्यासाठी वेगळेच कारण दिले. कुनुनकडे रिटर्न तिकीट सापडले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सोमवारी तिला तिच्या कुटुंबियांकडे पाठवले जात आहे.

 

ह्युमन राइट्स वॉचचा पुढाकार 
कुनुनचा व्हिडिओ व्हायरल होत असताना तिची दखल ह्युमन राइट्स वॉचने घेतली. तसेच तिला सौदीत किंवा तिच्या कुटुंबियांकडे पाठवू नये असे आवाहन केले आहे. अरब देशांमध्ये मानवाधिकार संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, तिला परत सौदीत किंवा कुटुंबियाकडे पाठवल्यास तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता आहे. तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊन परत पाठवल्यास गंभीर नुकसान होईल असेही संघटनेने स्पष्ट केले.