आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजकार्ता- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले. या प्रकारातील हे भारताचे पहिलेच सुवर्ण आहे. यासोबतच तो या प्रकारात एशियाड सुवर्ण जिंकणारा भारताचा पहिला नेमबाज व सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
सौरभने फायनलमध्ये २०१० चा विश्वविजेता ४२ वर्षीय जपानचा नेमबाज तोमोयुकी मत्सुदाला हरवले. २४ राउंडच्या फायनलमध्ये २२ राउंडपर्यंत मत्सुदा सौरभच्या पुढे होता. शेवटच्या दोन राउंडमध्ये सौरभने बाजी उलटवली.
सौरभचा विक्रम
> सौरभने २४०.७ अंकांसह या स्पर्धेत नवा विक्रम रचला. नेमबाजीत एकाच प्रकारात दोन पदके, अभिषेकला कांस्यपदक
> संजीव राजपूतने ५० मी. रायफल ३ पोझिशनमध्ये रौप्यपदक जिंकले.
> मंगळवारी भारताने एकूण पाच पदकांची कमाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.