आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साैरभ वर्मा, ऋतुपर्णा उपांत्य फेरीत; श्रीकांत, श्रुतीचे आव्हान संपुष्टात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ : सौरभ वर्मा आणि ऋतुपर्णा दास यांनी आपली विजयी माेहिम कायम ठेवताना घरच्या मैदानावरील सय्यद माेदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. यासह त्यांनी या आपापल्या गटातील किताबाचा दावा मजबूत केला आहे. दुसरीकडे भारताच्या अनुभवी के. श्रीकांतला पुन्हा एकदा अपयशाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे शुक्रवारी या स्पर्धेतील आव्हान संपुष्टामध्ये आले. त्याने या स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. मात्र, आता त्याला उपांत्यपूर्व फेरीमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागला. त्याला काेरियाच्या साेन वानने सरळ दाेन गेममध्ये पराभूत केले. साेन वानने २१-१८, २१-१९ ने सामना जिंकला. दुसरीकडे महिला एकेरीमध्ये श्रुती आणि दुहेरीच्या गटामध्ये सिमरन- रितिकाला अनपेक्षितपणे पराभवाला सामाेरे जावे लागले.

साैरभने थायलंडच्या कुनलावूतला सरळ दाेन गेममध्ये पराभूत केले. त्याने २१-१९, २१-१६ ने सामना जिंकला. यासह त्याने अंतिम चारमध्ये धडक मारली. तसेच ऋतुपर्णाने महिला एकेरीच्या लढतीत आपल्याच देशाच्या श्रुतीला पराभूत केले. तिने २४-२६, २१-१०, २१-१९ अशा फरकाने सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...