आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाच्या भोवऱ्यात अडकला \'ठाकरे\', दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने संवाद आणि भाषेवर घेतला आक्षेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'हिंदूहृदय सम्राट' अशी ओळख असणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट 'ठाकरे' सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर हिंदी आणि मराठीत नुकताच रिलिज झाला आहे. मात्र, ठाकरे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेल्या या सिनेमावर एका दाक्षिणात्य अभिनेत्याने नाराजी व्यक्त केली आहे. सिद्धार्थने ट्विटरवरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील एका संवादामुळे त्याची नाराजी झाली आहे. 

 

शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या दाक्षिणात्य आंदोलनाची एक झलक या ट्रेलरमध्ये दाखवली गेली आहे. "उठाओ लुंगी, बजाओ पुंगी" असा तो संवाद आहे. यामुळे सिद्धार्थ दुखावला आहे. तो म्हणाला, 'सिनेमातील हा संवाद दक्षिण भारतीय लोकांविरुद्ध व्देष पसरवणारा आहे. अशा सिनेमाला तुम्ही प्रतिसाद देणार का?'.  अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या.  

Nawazuddin has repeated 'Uthao lungi bajao pungi' (lift the lungi and *'#$ him) in the film #Thackeray. Clearly hate speech against South Indians... In a film glorifying the person who said it! Are you planning to make money out of this propaganda? Stop selling hate! Scary stuff!

— Siddharth (@Actor_Siddharth) December 26, 2018

ठाकरे सिनेमात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी याने केली आहे. सिनेमातील संवादाबरोबरच सिद्धार्थ याने नवाजुद्दीनने भूमिका साकारण्यावरही भाष्य केले आहे.  

Poetic justice is when a Muslim actor from UP gets to play the part of the revered Marathi bigot in a propaganda film.

— Siddharth (@Actor_Siddharth) December 26, 2018
बातम्या आणखी आहेत...