आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक वर्षी दिवाळीला कार, घर, दागिने गिफ्ट करणारे कोण आहेत सावजी ढोलकीया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही वर्षांपासून दिवाळीला आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट देऊन चर्चेत राहणारे हिरे व्यावसायिक आणि हरी कृष्णा एक्स्पोर्ट्सचे चेअरमन सावजी ढोलकीया या वर्षीही पुन्हा चर्चेत आले आहेत. या दिवाळीलाही बोनस स्वरूपात 600 कर्मचाऱ्यांना कार आणि 900 कर्मचाऱ्यांना एफडी दिली जाईल. या वर्षीची खास गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना ही भेट दिली जाईल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोण आहेत सावजी ढोलकीया


वयाच्या 13 व्या वर्षी सोडली शाळा
सावजी ढोलकीया गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील दुधाला गावातील रहिवासी आहेत. यांनी वयाच्या 13 व्या वर्षीच शाळा सोडून सुरत येथे आपल्या काकाच्या डायमंड बिझनेसमध्ये काम करू लागले.


कर्ज घेऊन सुरु केला हिऱ्यांचा व्यापार 
आपल्या काकांकडून कर्ज घेऊन यांनी डायमंड बिझनेस सुरु केला आणि मेहनतीच्या बळावर यशाच्या शिखरावर पोहोचले.


हरी कृष्णा एक्स्पोर्ट्सची स्थापना 
डायमंड पॉलिशिंगमध्ये 10 वर्ष कठोर मेहनत केल्यानंतर ढोलकीया यांनी वर्ष 1991 मध्ये हरी कृष्णा एक्स्पोर्टची स्थपणा केली. यावेळी कंपनीचा सेल नाममात्र होता.


2014 मध्ये बंपर वाढ
मार्च 2014 पर्यंत कंपनीचा टर्नओव्हर 4 अब्ज कोटींपर्यंत गेला. कंपनीचा टर्नओव्हर 2013 च्या तुलनेत 2014 मध्ये 104 टक्के वाढला.


6 हजारपेक्षा जास्त कर्मचारी 
सध्या सावजी ढोलकीया यांच्या कंपनीत 6 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. हे डायमंडचे दागिने तयार करून विदेशात निर्यात करतात. हे काम त्यांच्या दोन कंपन्या एच.के. डिझाइन्स आणि यूनिटी जेवेल्स करतात.


देशामध्ये 6,500 रिटेल आउटलेट्स
एच. के. जेवेल्स प्रायव्हेट ली. च्या माध्यमातून देशभरात हा बिझनेस चालतो. यांचा किसना डायमंड ज्वेलरी ब्रँड 6,500 रिटेल आउटलेट्सच्या माध्यमातून संपूर्ण देशात उपलब्ध आहे. 


50 देशांमध्ये निर्यात
सावजी यांची कंपनी जगभरात 50 पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करते. यामध्ये अमेरिका, बेल्जीयम, संयुक्त अरब, युएई, हॉंगकॉंग, चीन यासारख्या देशांमध्ये त्यांच्या सहायक कंपन्या आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...