नागपूर अधिवेशन / पहिल्याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले, 'मी सावकर' टोप्या घालून भाजप आमदारांची निदर्शने

विधानभवनात विरोधकांनी सावरकरांचे पोस्टर घेऊन निदर्शने केली विधानभवनात विरोधकांनी सावरकरांचे पोस्टर घेऊन निदर्शने केली
अधिवेशनापूर्वी भाजप आमदारांनी 'मी सावरकर' टोप्या घालून प्रवेश केला अधिवेशनापूर्वी भाजप आमदारांनी 'मी सावरकर' टोप्या घालून प्रवेश केला

  • राहुल गांधींच्या माफीची मागणी

दिव्य मराठी वेब टीम

Dec 19,2019 11:05:53 AM IST

नागपूर- आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या आमदारांनी सभागृहात ‘मी सावरकर’चा नावाच्या टोप्या घालून प्रवेश केला. यावेळी सर्व आमदार विधानसभेबाहेर "राहुल गांधीनी माफी मागावी...उद्धव ठाकरे होशमे आओ...इंधिरा गांधींच्या धिक्कार असो..." अशा घोषणा देत आहेत. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपच्या सर्व आमदारांनी भगव्या रंगाच्या ‘मी सावरकर’ लिहिलेल्या टोप्या घालून विधानभवनात प्रवेश केला. सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भाजप सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याची शक्यता आहे.

X
विधानभवनात विरोधकांनी सावरकरांचे पोस्टर घेऊन निदर्शने केलीविधानभवनात विरोधकांनी सावरकरांचे पोस्टर घेऊन निदर्शने केली
अधिवेशनापूर्वी भाजप आमदारांनी 'मी सावरकर' टोप्या घालून प्रवेश केलाअधिवेशनापूर्वी भाजप आमदारांनी 'मी सावरकर' टोप्या घालून प्रवेश केला
COMMENT