आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या एका गटासाठी सावरकरांच्या भारतरत्नाचे लॉलीपॉप; युक्रांदच्या कुमार सप्तर्षी यांचे पुण्यात प्रतिपादन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गोळवलकर गरुजींनी सावरकरांना नाकारलयं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सावरकरांना मानणारा एक गट आहे. संपूर्ण संघ सावकरमय नाही. मात्र, सावरकरांचे समर्थन करणाऱ्या गटाला शांत करण्यासाठी सावकरांना भारतरत्न देण्याविषयी भाजप सांगत आहे. वास्तविक आयारामांना प्रवेश देणे गैर आहे, असे म्हणणाऱ्या  भाजपामधील लोकांसाठी सावकरांच्या भारतरत्नाचे लॉलीपॉप आहे, अशी टीका युक्रांदचे कुमार सप्तर्षी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. सावकरांच्या स्वप्नात भारत नाही, तर मुस्लिम लीगच्या धोरणात मुस्लिम होते. तसे सावकरांच्या लेखी हिंदू महासभेच्या माध्यमातून फक्त हिंदू होते. त्यांच्या स्वप्नात भारत नव्हता. म्हणून त्यांना भारतरत्न नाहीतर हिंदूरत्न सरकारने देऊन टाकावे. त्यांचा भारतरत्नशी काय संबध आहे. विरोध शमवण्यासाठी महात्मा फुलेंना भारतरत्न देण्याची भूमिका मांडायची,  असे सप्तर्षी म्हणाले.  
 
 

राष्ट्रीय हिताचे बोलणाऱ्यांना खूप त्रास दिला जात असून शिक्षणाचे भगवीकरण सुरू आहे. नागरिकांचे हक्क कमी करत जाऊन फक्त जातीधर्माची माणसे शिल्लक राहतात. सध्याच्या निवडणुकामध्ये प्रचंड जातीवाद आहे. मराठा, धनगर, माळी असा जातीयवाद आहे. म्हणून युवक क्रांती दलाने किशोर शिंदे (मनसे, कोथरूड पुणे) रोहीत पवार (राष्ट्रवादी काँग्रेस,कर्जत जामखेड) सचिन दोडके (खडकवासला पुणे) शिवकुमार लाड (वडाळा) युवराज मोहिते (गोरेगाव, मुंबई), विजयसिंह पंडित (गेवराई, बीड) राहुल कलाटे (चिंचवड, पुणे) बच्चु कडू (अचलपूर, अमरावती) अरविंद शिंदे (कसबा पुणे) या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. हे उमेदवार भाजपा उमेदवाराचा पराभव करू शकतील, असे युक्रांदकडून सांगण्यात आले.
 
 

सध्या भाजपामध्ये भाजप विचाराच्या मंडळींचा भरणा कमी असून भाजपामध्येच भाजपा राहिला नाही. भाजपाच्याविरोधात नसणारा माणूस भूतकाळात निर्गुणात रमणारा मतदार म्हणावा लागेल. स्वार्थजागा झाल्याशिवाय भाजपात कोणी जात नाही. भ्रष्टाचार केला नाही म्हणून तुरुंगात न जाण्याचा स्वार्थ. बेनामी संपत्तीच्या मुद्द्यावरून स्वार्थ, या कारणातूनच नेतेमंडळी भाजपात गेली आहेत, अशी टीका त्यांनी भाजपाच्या गोटात दाखल झालेल्या राजकीय मंडळीविषयी केली.  साबरमती गांधी आश्रमाची जागा गांधीवाद्याच्या ताब्यातून घेण्यासाठी सरकारने नोटीस बजावली आहे. भाजपाचा अन् गांधीचा काय सबंध.भारतीय आहेत इथपर्यंत ठीक आहे. जेथे संबध नाही. मात्र, संपत्ती असल्याने शिरकाव करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  
 

छळवादाबाबत सल्ल्यासाठी मोदी अरब राष्ट्रात जातात
लोकांना राजे महाराजे नकोत, काश्मिरामध्ये नागरिकांवर सुरू असलेल्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणारे देशद्रोही ठरवून पाकिस्तानप्रमाणे आपल्या देशात भाषा बोलली जाते. देशात इस्त्राईल पॅटर्नवर लोकांना छळले जात आहे. म्हणून अरब राष्ट्रांत अशा प्रकारच्या छळवादी सल्लामसलती करण्यासाठी साठी मोदी अरब राष्ट्रात जातात, असेही  त्यांनी मोदींचे नाव न घेता टीका केली. या वेळी मोठ्या संख्येने युक्रांदचे कार्यकर्ते उपस्थित होते.