आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद अभियान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्याच्या काहिलीपासून बचाव करण्याचे मानवाकडे अनेक मार्ग आहेत. मात्र, प्राणी-पक्ष्यांकडे मैलोन् मैल पाणी आणि सावली शोधण्यापलीकडे दुसरा उपाय नाही. मुक्या जीवांची ही वेदना जाणून दैनिक दिव्य मराठीने सुरू केलेल्या अभियानाचे कौतुक करावे तेवढे थोडे! आपल्या अंगणात, फ्लॅटच्या बाल्कनीत, खिडकीत, टेरेसवर येणार्‍या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे मातीचे भांडे दिले जाते. मागील वर्षीही या उपक्रमांतर्गत मी एक मातीचे भांडे नेले होते. हे पाणी पिण्यासाठी आलेल्या पक्ष्यांमुळे माझ्या घरातही अनेक वर्षांनी किलबिलाट ऐकायला मिळाला. वेगवेगळे पक्षीही पाहता आले. बालपणी अंगणात पाहिलेले पक्षी कुठे तरी दूर निघून गेले होते, असे वाटायचे, मात्र या उपक्रमामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी तर मिळालेच, शिवाय पक्षी आणि माणसांमधील दुरावलेले अंतर सांधले गेले. त्यामुळे यावर्षी मातीचे भांडे घेताना मी माझ्या इतर मित्रांनादेखील सोबत घेऊन आलो. फ्लॅटमधील आमच्या ग्रुपलाही हा उपक्रम खूप आवडला आहे.