प्रदुषण / 'आम्हाला प्रदुषणापासून वाचवा', हरभजन सिंगची नरेंद्र मोदींना विनंती

हरभजनने एक व्हिडिओ शेअर करुन दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनाही अपील केली
 

Nov 06,2019 02:42:00 PM IST

स्पोर्ट डेस्क- क्रिकेटर हरभजन सिंगने सोमवारी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अपील केली आहे की, त्यांनी उत्तर भारतातील वायु प्रदुषणापासून लोकांना वाचवावे. हरभजनने व्हिडिओमध्ये दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील मुख्यमंत्र्यांनाही याबाबत अपील केली आहे. तसेच, या संकटासाठी तात्काळ बैठक बोलवून काहीतरी तोडगा काडण्याची विनंती केली आहे.


हरभजन म्हणाला की, "उत्तर भारतात वायु प्रदूषणामुळे हवा दुषित झाली आहे. त्यासाठी आपण सर्व कारणीभूत आहोत. आपल्यामुळेच हे वायु प्रदुषण होते. यामुळे लोकांचे जगणे अवघड झाले आहे. यामुले लोकांचे आयुष्य 7-10 वर्षांनी कमी होत आहे.


‘लोकानीही जबाबदारी घ्यायला हवी’

पुढे तो म्हणाला की, ‘‘आपल्या सर्वांना पंतप्रधानांना विनंती करावी लागेल. तिन्ही राज्य (दिल्ली, पंजाब आणि हरियाणा)च्या मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांची भेट घेऊन या बाबतीत चर्चा करावी. पंतप्रधनांनी याबाबत काहीतरी मार्ग काढावा. यासाठी आपणा सर्वांनाच जबाबदारी घ्यावी लागेल.’’

X