आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- जगातील सर्वात मोठे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपचे सीईओ क्रिस डेनियल्स यांनी मंगळवारी माहिती व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेतली. प्रसाद यांनी अमेरिकी कंपनीला स्पष्ट केले की, 'कंपनीला भारतात कार्यालय सुरू करावे लागेल. या प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज किंवा मेसेजच्या स्रोताची माहिती मिळेल असे तंत्रज्ञानदेखील विकसित करावे लागेल. जर कंपनीने असे केले नाही तर कंपनीच्या विरोधात चिथावणीखोरीच्या आरोपात खटला दाखल करावा लागेल.'
अलीकडच्या काळात सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या मेसेजमुळे मॉब-लिंचिंगसारख्या घटना वाढल्या अाहेत, त्या दृष्टीने प्रसाद यांनी घेतलेली ही कडक भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जगभरातील व्हॉट्सअॅपचे सर्वाधिक २० कोटी ग्राहक भारतात आहेत. भारतातूनच सर्वाधिक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड केले जातात. बैठकीनंतर मीडियाशी चर्चा करताना आयटी मंत्र्यांनी सांगितले की, फेक मेसेजचा स्रोत माहिती करून घेण्यासाठी एखाद्या रॉकेट सायन्सची गरज नाही. त्यामुळे कंपनीला यावर उपाय शोधावाच लागणार आहे. या दृष्टीने कंपनी काम करत असल्याचे अाश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले आहे.
व्हॉट्सअॅपकडून असलेल्या अपेक्षा
- व्हॉट्सअॅपने भारतात कार्यालय उघडावे.
- तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
- भारतीय कायद्याचे पालन.
व्हॉट्सअॅपने अातापर्यंत काय केले
- फॉरवर्ड मेसेज ओळखण्याचे नवीन फीचर सुरू केले.
- मेसेज एकाच वेळी फॉरवर्ड करण्यासाठी ५ युजरची मर्यादा.
- फेक न्यूजसाठी जनजागृती.
कंपनीसाठी भारत महत्त्वाचा
- जगभरात कंपनीचे १५० कोटी युजर आहेत. सर्वाधिक २० कोटी युजर भारतात आहेत. सुमारे २८ टक्के भारतीय व्हॉट्सअॅपवर अॅक्टिव्ह असतात.
- व्हॉट्सअॅपची पालक कंपनी फेसबुकचेही सर्वाधिक २७ कोटी युजर भारतात आहेत. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्या ठिकाणी २१ कोटी युजर आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.