Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | say Ahmednagar to Ambikanagar, Bhide Guruji's fatwa

धारकऱ्यांनो, अहमदनगरला अंबिकानगर म्हणा, नगर येथे मार्गदर्शन करताना भिडे गुरुजींचा फतवा

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 12:14 PM IST

अहमदनगरला अंबिकानगर म्हणावे, असा वादग्रस्त फतवा संभाजी भिडे गुरुजी यांनी काढला आहे.

  • say Ahmednagar to Ambikanagar, Bhide Guruji's fatwa
    नगर - अहमदनगर शहराच्या नामांतराबाबत सरकार निर्णय घेईल किंवा न घेईल, पण धारकऱ्यांनी मात्र आतापासूनच या शहराला अंबिकानगर म्हणावे, असा वादग्रस्त फतवा संभाजी भिडे गुरुजी यांनी काढला आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण सेान्याचे सिंहासन तयार करायचे आहे. त्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नगरमध्ये घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरील सिंहासन कोणत्याही परिस्थितीत व्हायलाच हवे, असा संकल्प या वेळी सोडण्यात आला. हा संपल्प पूर्ण करण्यासाठी भिडे गुरुजी यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. शनिवारी ते नगरला आले असता त्यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. सिंहासन पूर्ण करण्यासाठी नगरमध्ये चार तुकड्या त्यांनी तयार करण्याचे आवाहन केले. प्रत्येक तुकडीमध्ये दोन हजार लोकांचा समावेश असणार आहे. ४ जून २०१७ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी सेान्याचे सिंहासन बसवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. यापुढे नगर शहराला अहमदनगर न म्हणता अंबिकानगर म्हणा, असा फतवा त्यांनी या बैठकीत काढला. शहराच्या नामांतराबाबत सरकार निर्णय करो किंवा नाही, आपल्या हातात भगवा झेंडा आहे, त्यामुळे आपण आतापासूनच अंबिकानगर म्हणायला सुरुवात करा, असे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात नगरमध्ये पुन्हा एक सभा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहराचे नामांतर करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी जोर धरू लागली होती. नंतर ती निवळली आता या फतव्यामुळे पुन्हा वादाची ठिणगी पडणार आहे.

Trending