RBI / सणांसाठी एसबीआयची स्वस्त कर्जाची ऑफर, कमी व्याजदरात वाहन आणि गृह कर्ज उपलब्ध

'बॅलन्स इन्क्वायरी, फेल ट्रांझॅक्शनची गणना फ्री लिमिटमध्ये करू नका'

वृत्तसंस्था

Aug 21,2019 09:45:22 AM IST

नवी दिल्ली - सणासुदीचा हंगाम सुरू हाेण्याच्या अगाेदर स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने सणासुदीच्या आॅफरची घाेषणा करताना ग्राहकांना याअंतर्गत विविध प्रकारे दिलासा दिला आहे. यामध्ये कमी व्याजावर वाहन आणि गृह कर्ज देण्यात येणार आहे. ग्राहकांना कर्जासाठी प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार नाही. तसेच विविध श्रेणींच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ हाेईल. वेतन खाते असणारे ग्राहक फक्त चार क्लिक करून ५ लाख रुपयांपर्यतचे प्री-अॅप्रूव्हड डिजिटल कर्ज प्राप्त करू शकतात.


ही सणासुदीची आॅफर केव्हा सुरू हाेणार हे बँकेने अद्याप सांगितलेले नाही. परंतु एसबीआयच्या धर्तीवर अन्य बँकाही सणासुदीच्या आॅफर देऊ शकतात. स्टेट बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार सणासुदीसाठी बँकेने माेटार कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. म्हणजे माेटार कर्ज घेताना ग्राहकांना प्राेसेसिंग शुल्क द्यावे लागणार नाही.


10.75% दराने वैयक्तिक लाेन
- स्टेट बँक २० लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लाेन १०.७५ %च्या व्याजदराने देत आहे. हे कर्ज कमाल ६ वर्षांच्या कालावधीत फेडता येऊ शकेल. यामुळे ग्राहकांवरील मासिक किमान हप्त्याचे (ईएमआय) आेझे कमी हाेईल.
- पगारदार ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंत पूर्वमंजूर डिजिटल कर्ज बँकेच्या याेनाे अॅपवर चार क्लिकमध्ये मिळेल.


8.25% दराने शैक्षणिक कर्ज
- ही आघाडीची भारतीय स्टेट बँक देशात शिक्षण घेण्यासाठी ५० लाख रुपये आणि विदेशातील शिक्षणासाठी १.५० काेटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज ८.२५ % दराने उपलब्ध करुन देत आहे.
- हे कर्ज कमाल १५ वर्षांच्या कालावधीत फेडता येईल. यामुळे शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांवरील ईएमआयचा ताण कमी हाेण्यास मदत हाेऊ शकेल.


8.05% च्या कमी दरावर गृह कर्ज
- स्टेट बँकेने अलीकडेच आपला एमसीएलआर ०.१५ % घटवला हाेता. एप्रिल २०१९पासून बँकेने यामध्ये ०.३५ % घट केलेली आहे. एमसीएलआर असा दर असताे, ज्यात कमीवर बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही.
- स्टेट बँकेच्या गृह कर्जावर सर्वाधिक ८.०५ % कमी व्याजदर आहे. व्याजदर रेपाे दराशी जाेडले आहेत. हे दर नवीन आणि विद्यमान गृह कर्जावर १ सप्टेंबरपासून लागू हाेतील.


५९ मिनिटांत कर्ज याेजनेंतर्गत गृह व वाहन कर्ज देतील सरकारी बँका
सरकारी बँका केवळ ५९ मिनिटांत कर्ज देण्याच्या याेजनेनुसार गृह आणि वाहन कर्जासह रिटेल उत्पादने आणण्याच्या तयारीत आहेत. बँक आॅफ इंडिया गृह आणि वाहन कर्जासारख्या काही रिटेल उत्पादनांना पाेर्टलवर आणण्याची याेजना आखत असल्याची माहिती बँकेचे महाव्यवस्थापक सलीलकुमार स्वैन यांनी दिली. सध्या psbloansin59minutes या पाेर्टलवर एमएसएमईना १ काेटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर एक तासाच्या आत तत्त्वत: मंजुरी दिली जाते. स्टेट बँक, युनियन बँक आणि काॅर्पाेरेशन बँकेने आपल्या पाेर्टलच्या माध्यमातून पाच काेटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॅलन्स इन्क्वायरी, फेल ट्रांझॅक्शनची गणना फ्री लिमिटमध्ये करू नका, रिझर्व्ह बँकेची बँकांना सूचना
मुंबई । तांत्रिक कारणाने तसेच एटीएममध्ये रक्कम नसल्याने न होणाऱ्या व्यवहारांचा समावेश एटीएमच्या मोफत ट्रांझॅक्शनच्या मर्यादेत करू नये, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना केले आहे. खात्यातील रकमेची माहिती (बॅलन्स इन्क्वायरी), चेक बुकसाठी मागणी अर्ज, कर भरणा, फंड ट्रान्सफर यांसारखे व्यवहारही मर्यादित ट्रांझॅक्शनच्या कक्षेबाहेर ठेवावेत, असेही रिझर्व्ह बँकेने सुचवले आहे.

X
COMMENT