आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

78 वर्षीय वृद्धाकडे आले एक लेटर, त्यात लिहीले होते- तुमच्या खात्यात 24 लाख रू. आहेत, त्यापैकी 50 हजार टीडीएस कट करण्यात आलाये, ते पाहून पोहचले बँकेत, नंतर समोर आले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद(गुजरात)- येथील एका 78 वर्षीय वृद्धाला त्याच्या एसबीआयच्या खात्यातून टीडीएस कट केल्याची माहिती मिळाली. आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, त्या वृद्धाचे बँकेत कोणतेही खाते नव्हते. बँकेने त्यांना जे पत्र पाठवले होते,त्यात लिहीले होते की, तुमच्या खात्यात 24 लाख रूपये आहे आणि त्यातून 50 हजार टीडीएस कट करण्यात आलाय. तो व्यक्ती बँकेत गेला आणि मॅनेजरला सगळा प्रकार सांगितला, तेव्हा त्यांनादेखील विश्वास बसत नव्हता.


सॅटेलाइट निवासी हर्षद छोटेलाल मेहता यांनी सांगितले की, एसबीआयमध्ये त्यांच्ये कोणतेही अकाउंट नाहीये. त्यानंतर बँकेने त्यांना पॅनच्या केव्हायसीची यादी दाखवली, ज्यात त्यांचे नाव होते. त्यानंतर त्यांनी आयकर विभागात जाऊन चौकशी केली.


नंतर समोर आले सत्य
हर्षद भाई यांनी सांगितले की, बँकेत त्यांचे कोणतेही खाते नाहीये तर बँकेकडे त्यांच्या पॅनचे डीटेल्स कसकाय पोहचले. त्यानंतर तपास केल्यावर कळाले की, हे खाते दुसऱ्या एका हर्षद राय चुनीलाल मेहता नावाच्या व्यक्तीचे आहे, जे 1977 पासून सुरू आहे. तेव्हापासून त्या खात्यात व्याजाचे पैसे वाढत गेले आणि इतकी मोठी रक्कम जमा झाली.

बातम्या आणखी आहेत...