आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SBI Cheapens Loans For The Second Time In A Month, Reduces Interest On Fixed Deposit, 3% Interest On Savings Account

एसबीआयने एका महिन्यात दुसऱ्यांदा स्वस्त केले कर्ज, मुदत ठेवीवरील व्याज घटवले, बचत खात्यावर ३% व्याज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ३० वर्षांच्या गृह कर्जाचा ईएमआय प्रति १ लाख ७ रुपये आणि ७ वर्षांच्या कार लोनचा हप्ता प्रति १ लाखाला ५ रु. कमी होईल
  • एसबीआयच्या ४४.५१ कोटी बचत खातेधारकांना फायदा
  • बचत खात्यात किमान जमा ठेवावी लागणार नाही, सक्ती संपवली

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा केवळ आपले कर्ज स्वस्त करण्याची घोषणा केली नाही तर मुदत ठेवीच्या दरांतही कपात केली आहे. यामुळे एसबीआयचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त झाले. दुसरीकडे, विविध अवधीच्या मुदत ठेवीवर व्याजही घटवले आहे. नवीन दर १० मार्चपासून लागू होईल. ताज्या आकडेवारीनुसार, एसबीआयने विविध अवधीसाठी आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये ०.१०-०.१५% पर्यंत घटवण्याची घोषणा केली आहे. यामुळे एका वर्षाचा एमसीएलआर ७.८५% घटून ७.७५% वर आला आहे. ही चालू वित्त वर्षात एमसीएलआरमध्ये सलग १० वी कपात आहे. या कपातीनंतर एमसीएलआरशी संबंधित ३० वर्षांच्या अवधीच्या गृह कर्जाचा हप्ता प्रती एक लाख रुपये रकमेवर ७ रु. कमी होईल. सात वर्षांच्या कार लोनचा हप्ता प्रती एक लाख रु. रकमेवर पाच रु. कमी होईल. एमसीएलआर हा असा दर असतो, ज्यात कमी व्याज दरावर बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. ही व्यवस्था १ एप्रिल २०१६ पासून लागू झाली होती. बँकिंग तंत्रात रोकडची पुरेशी मात्रा पाहता एसबीआयने आपले मुदत ठेवीचे दर तर्कसंगत बनवले आहेत.एसएमएस सेवेसाठी तिमाही आधारावर वसूल केले जाणारे शुल्क रद्द केले


बचत खातेधारकांना “झीरो बॅलन्स’ खाते सुविधा मिळू लागेल. या पावलामुळे एसबीआयच्या ४४.५१ कोटी बचत खातेधारकांना फायदा होईल. सध्या महानगरांत बचत खातेधारकांना एएमबी ३ हजार रु., शहरांत २ हजार रु. आणि ग्रामीण भागात १ हजार रु. खात्यात ठेवावे लागतात. बचत खात्यांवर वार्षिक व्याजदर घटवून ३% केला आहे.
 तिमाही एसएमएस सेवा शुल्कही रद्द केले
 
याशिवाय बँकेने तिमाही आधारावर एसएमएस सेवेसाठी वसूल केले जाणारे शुल्कही रद्द केले आहे. यासंदर्भात बँकेचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, या निर्णयामुळे आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या चेहऱ्यावरील हास्य आणखी वाढेल. एएमबी माफ करणे ग्राहकांच्या चांगल्या बँकिंग अनुभवासाठी उचलले आहे. एमसीएलआर का घटतोय?
 
कंपनी रोख्याचे दर आधीपेक्षा खाली आले आहेत. सरकारी रोख्यांच्या व्याज दरही ६%पेक्षा खाली आले. लाँग टर्म रेपोही ५.१५ च्या किमान स्तरावर आहे. यामुळे एमसीएलआर घटतोय.

 

अन्य बँकाही करू शकतात कपात


प्रत्येक बँकेचा निधी जमवण्याचा खर्च वेगवेगळा असतो. रिझर्व्ह बँकेने सीआरआरशी संबंधित नियम सैल केले आहेत. त्यामुळे अन्य बँकांकाही कपात करू शकतात.
-मदन सबनवीस, चीफ इकॉनॉमिस्ट, केअर रेटिंग एजन्सीबातम्या आणखी आहेत...