आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI ग्राहकांना सूचना: 31 डिसेंबर पर्यंत केले नाही हे काम, तर बंद पडेल तुमचे ATM कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - स्टेट बँकेने ATM कार्डबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँक जुने डेबिट कार्ड बंद करत आहे. यामुळे ग्राहकांना त्या कार्डद्वारे व्यवहार करता येणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी आणि त्यांच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी जुने एटीएम कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने कार्ड मॅजिस्ट्रीप (मॅगनेटिक) डेबिट कार्ड आहेत. बँक जुन्या कार्डऐवजी नवीन तंत्रज्ञानाचे चिप असणारे ईएमव्ही कार्ड देणार आहे. बँकेने सर्व ग्राहकांना एटीएम कार्ड बदलण्यासाठी 31 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. 

 

निघणार नाहीत एटीएम मधून पैसे
> तुमच्याकडे जुने मॅजिस्ट्रीप(मॅग्नेटिक) कार्ड असेल तर तात्काळ बदलून घ्या. कारण जुने कार्ड बंद होणार आहेत. त्याबदल्यात ग्राहकांना ईएमव्ही चिपचे डेबिड कार्ड घेणे सक्तीचे आहे. कार्ड बदलून घेण्यासाठी 31 डिसेंबर अंतिम तारीख देण्यात आली आहे. आपण जर असे केले नाही तर तुमच्या जुन्या एटीएम कार्डने कोणतेही व्यवहार होणार नाहीत. कारण 31 डिसेंबर नंतर बँकेचे एटीएम मशीन जुने कार्ड स्विकारणार नाहीत.  

 

काय करावे?
> बँकेने ट्वीट केलेल्या माहितीनुसार जुन्या एटीएम कार्डच्या जागी नवीन ईएमव्ही चिपचे कार्ड देण्यात येणार आहे. नवीन कार्ड घेण्यासाठी ऑनलाइन बँकिंग किेवा बँकेच्या शाखेत अर्ज सादर करू शकता. बँकेने फेब्रुवारी 2017 मध्ये जुने कार्ड बंद केले असून 31 डिसेंबर 2018 नंतर ते पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. 

Dear Customers, it’s time to make a shift. As per the RBI guidelines, you are required to change your Magstripe Debit Cards to EMV Chip Debit Cards by the end of 2018. The conversion process is absolutely safe and comes with no charges. Know more: https://t.co/hgDrKXlInp pic.twitter.com/QoLZZSQuEj

— State Bank of India (@TheOfficialSBI) August 10, 2018

 

 

 

अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या...

https://bank.sbi/portal/web/personal-banking/magstripe-debit-cardholders

 

जुने कार्ड बंद होण्यामागचे कारण
> जुन्या एटीएम आणि डेबिट कार्डच्या मागे एक काळी पट्टी असते. ही काळी पट्टी मॅग्नेटिक स्ट्रीप असून यामध्ये आपल्या खात्याची संपूर्ण माहिती असते. या स्ट्रीपद्वारे आपण एटीएममधून पैसे काढू शकतो आणि सामानाची खरेदी करताना कार्डला स्वाईप करतो. 

 

 मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड  सुरक्षित नसल्याचा बँकेचा दावा
> रिझर्व्ह बँकेच्या मते, मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड जुने तंत्रज्ञान झाले आहे. हे कार्ड्स पुर्णत: सुरक्षित नसल्यामुळे बंद करण्यात आले आहे. आता मॅग्नेटिक स्ट्राइप कार्डऐवजी ईएमव्ही चिप असणाऱ्या कार्ड्सची निर्मीती करण्यात आली आहे. सर्व जुन्या कार्ड्सला नवीन चिप कार्डसोबत बदलण्यात येणार आहे.

 

सुरक्षित आहेत EMV चिपचे कार्ड 
> ईएमव्ही चिप असणाऱ्या कार्डमध्ये एक छोटी चिप असते ज्यामध्ये आपल्या खात्याची संपूर्ण माहिती असते. आपल्या खात्याची माहिती चोरी होऊ नये यासाठी ही माहिती इन्स्क्रीप्टेड असते. ईएमव्ही चिप कार्डमध्ये व्यवहारादरम्यान एक यूनिक व्यवहार कोड तयार होतो. जो ग्राहकाची ओळख दर्शवितो. मॅग्नेटिक स्ट्राइप कार्डमध्ये असे होत नव्हते.

 

बातम्या आणखी आहेत...