आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयचे ई-कॉर्नर जळून खाक; तीन एटीएमसह एका सीडएम मशिनचे नुकसान

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

परभणी - शहरातील स्टेडियम जवळील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात असलेले ई-कॉर्नर बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास जळून खाक झाले. यात 3 एटीएम मशिन, 1 कॅश डिपॉझीट मशिन व एक नाण्यांची मशिन पूर्णपणे जळ्याल्या. नुकसानीचा निश्‍चीत आकडा अद्याप समोर येवू शकला नाही.

स्टेडियम समोरील महात्मा फुले चौकात मुख्य रस्त्यावर एसबीआय बँकेलगत वातानुकुलीत असे बँकेचे ई-कॉर्नर सेंटर आहे. या सेंटरमध्ये एटीएम मशिन्ससह कॅश डिपॉझीट व नाण्यांची मशिनही  आहे. याठिकाणी ग्राहकांची मोठी वर्दळ असते. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास आतमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नवा मोंढा पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाला ही पाचारण करण्यात आले. परंतू तत्पुर्वीच आगीने सर्व मशिन्स व एसी यांना कवेत घेतले होते. आगीचे लोळ उठल्यानंतर अग्निशमनदलाचा बंब दाखल झाला. सर्व इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स असल्याने बॅटऱ्यांची संख्या ही मोठी होती. सर्वच जळून खाक झाले. आग विझविण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाच्या एका जवानाच्या हातालाही दुखापत झाली. या प्रकरणी बँक व्यवस्थापनाने नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र एटीएम मशिन्स मधील रोख रक्कम व अन्य नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.