आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील
व्याजाचे दर ०.०५ टक्क्यांनी घटवले आहेत. रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी एसबीआयने ही घोषणा केली. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी रेपो दर ०.२५ टक्क्यांनी घटवून ६.२५ टक्के केला होता. एसबीआयच्या या निर्णयामुळे ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) ९६ रुपयांनी कमी होईल. आतापर्यंत हा ईएमआय २६६०७ रुपये होता, आता तो २६,५११ रुपये होईल. एसबीआयनंतर आता इतर बँकाही आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.
25 लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर 80 रुपये बचत
कर्ज जुना ईएमआय नवा ईएमआय बचत रक्कम
25 लाख 22,173 22,093 80
30 लाख 26,607 26,511 96
( जुन्या आणि नव्या ईएमआयची गणना अनुक्रमे ८.८० आणि ८.७५ च्या आधारे केली आहे. कर्ज कालावधी २० वर्षे गृहीत धरला आहे.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.