Home | Business | Business Special | SBI introduces cardless ATM withdrawals with YONO cash

आता ATM कार्डशिवाय मशीनमधून काढता येतील पैसे, SBI ने सुरू केली नवीन सुविधा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 01:49 PM IST

देशभरातील 16,500 एटीएमवर मिळेल या सुविधेचा लाभ.

 • SBI introduces cardless ATM withdrawals with YONO cash

  नवी दिल्ली- देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक(SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली आहे. या सुविधेच्या अंतर्गत SBI च्या ग्राहकांना ATM कार्डविना पैसे काढता येतील. SBI ने या सुविधेला YONO Cash कॅश असे नाव दिले आहे. SBI च्या ग्राहकांना देशभरातील 16,500 एटीएमवर या सुविधेचा लाभ मिळेल.


  असे निघतील पैसे
  SBI च्या या सुविधेच्या लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या मोबाईलमध्ये YONO अॅप डाउनलोड करावा लागेल. या अॅपवर ग्राहकांना एक 6 डिझीट YONO पीन सेट कराला लागेल. जेव्हा ग्राहक या अॅपवरून पैसे काढण्यासाठी अप्लाय करेल तेव्हा त्याला एसएमएसद्वारे 6 डिझीट रेफरंस कोड येईल. या रेफरंस कोड आणि YONO पीन च्या मदतीने ग्राहकांना आपल्या जवळीलच्या ATM मध्यून YONO Cash Point ने कॅश काढता येईल. भारतीय स्टेट बँक कार्डलेस कॅश देणारी SBI पहिली बँक बनली आहे.


  2017 मऱध्ये लॉन्च झाला होता YONO APP
  भारतीय स्टेट बँकेने नोव्हेंबर 2017 मध्ये YONO App लॉन्च केले होते. आज देशात YONO App फाइनांशियल आणि लाइफस्टाइल सेवा देणारा देशातील सर्वश्रेष्ठ अॅप बनला आहे. या अॅपवर अंदाजे 85 ई-कॉमर्स कंपन्या लिस्टेड आहेत, ज्यावरून एसबीआय ग्राहक आपल्यासाठी खरेदी करू शकतात. स्टेट बँकेनुसार, फेब्रुवारी 2019 पर्यंत 1.8 कोटी लोकांनी YONO App डाउनलोड केले आहे आणि 70 लाखांपेक्षा जास्ती याचे अॅक्टीव्ह युझर्स आहेत. YONO App अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Trending