SBI ची ग्राहकांसाठी मोठी ऑफर, आता मिळेल घर खरेदीवर 2.67 लाख रूपयांची सुट, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

दिव्य मराठी

Apr 16,2019 12:55:00 PM IST

नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडियाने घर खरेदी करण्यासाठी आपल्या ग्राहकांना मोठी ऑफर दिली आहे. जर तुम्ही पहिल्यांदा घर खरेदी करत असाल, तर एसबीआय तुम्हाला गृह कर्जावर 2.67 लाख रुपयांची सुट देणार आहे. ही संबंधित सुट अनुदानाच्या स्वरुपात असणार आहे. बँकेने आपल्या या योजनेला ‘अपने सपनो का घर हो सकता है’ अशी टॅगलाईन दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.


काय आहे ऑफर?
पहिल्या घर खरेदीसाठी ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत (PMAY) 2.67 लाख रुपयांचे अनुदान मिळेल. हे अनुदान गृहकर्जाच्या व्याजावर दिले जाईल, म्हणजेच गृहकर्जाच्या व्याजातील रकमेपैकी 2.67 लाख रुपये भरण्यात सुट मिळणार आहे. एसबीआयच्या गृहकर्जाच्या वार्षिक व्याजाचा दर 8.60 टक्के आहे.


SBI च्या गृहकर्जावर अनुदानासोबतच इतरही सुविधा देण्यात येणार आहेत. संबंधित कर्ज दुसऱ्याकडे हस्तांतरित करताना बँक कोणतेही प्रक्रिया शुल्क घेणार नाही. तसेच घराच्या नुतनीकरणासाठीही कर्ज घेऊ शकणार आहे. PMAY योजनाअंतर्गतचे अनुदान केवळ 2 गटांसाठी होते, त्यात 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणारा आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट (EWS) आणि 6 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणारा अल्प उत्पन्न गट (LIG) यांचा समावेश होता. पण, आता यात आणखी 2 गटांचा समावेश करण्यात आला असून त्यानुसार 12 आणि 18 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्जाव्यतिरिक्तच्या अनुदानाची रक्कम मात्र, सर्व गटांसाठी सारखीच असणार आहे.


कोणाला किती अनुदान मिळेल?

5 टक्क्यांची अनुदान सुट फक्त 6 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीच असणार आहे.
12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्राहकांना 9 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 4 टक्के व्याजाचे अनुदान मिळणार आहे.
18 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गटाला 12 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज अनुदान मिळेल.


वेळेआधीच कर्ज फेडा आणि व्याज टाळा
SBI ने ग्राहकांसाठी लवकर कर्ज फेडण्यासाठी प्रीपेमेंटची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार लवकर कर्ज रक्कम भरले तर त्यावर कोणतीही पेनल्टी असणार नाही. याचा उपयोग करुन ग्राहक व्याज भरण्यापासून स्वतःचा बचाव करु शकतील

X