• Home
  • Business
  • SBI launches personal gold loan for wedding season, only 9.75% interest will be charged

Gold Loan / पर्सनल फायनांस / लग्नासाठी SBI ने लॉन्च केले 'पर्सनल गोल्ड लोन', फक्त 9.75 टक्के लागणार व्याज


सोन्यावर 20 लाख रूपयांपर्यंत मिळणार कर्ज

दिव्य मराठी

May 06,2019 01:40:00 PM IST

नवी दिल्ली- लग्नाच्या हंगामात प्रचंड प्रमाणात सोने खरेदी केले जाते. पण काही वेळेस लग्नाचे बजेट बिघडते. म्हणून अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने 'पर्सनल गोल्ड लोनची' सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत ग्राहक 20 लाखापर्यंतच्या कर्जाचा लाभ घेऊ शकतो. एसबीआयनुसार, कमीतकमी कागदपत्र आणि कमी व्याजदरासह बँकांनी विकलेल्या सोण्याच्या नाण्यांसहित दागदागिने देउन कर्जाचा लाभ घेतला जाऊ शकतो. सोन्याची मालमत्ता ठेवणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही व्यवसायाची किंवा वैयक्तिक गरजांची पुर्तता करण्यासाठी रोख रक्कम दिली जाईल.


जाणून घ्या कर्जासाठी लागणाऱ्या आवश्य गोष्टी

1. पात्रता
18 वर्षापेक्षा अधिक वय असलेले सर्वजण एसबीआयकडुन गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकतात. व्यक्ति एक किंवा संयुक्त आधारवर अर्ज करू शकतो, पण त्यांच्याकडे उत्पन्नाचा एक कायमस्वरूपी स्रोत असावा. आपल्याला कर्जासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.


2. व्याजदर
SBI एकवर्षाच्या गोल्ड लोनसाठी MCLR (फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट की मार्जिनल कॉस्ट) 1.25% इंटरेस्ट रेट ऑफर करते. बॅंकेच्या वेबसाइटनुसार, 10 एप्रिल 2019 पासुन बँकेचा एक वर्षाचा एमसीएलआर 8.5% एवढा आहे. म्हणजे एसबीआय पर्सनल गोल्ड लोन योजनेसाठी व्याजदर 9.75% आहे.


3. कर्जाची रक्कम आणि भरणा
जास्तीतजास्त 20 लाखांचे कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची कमीतकमी रक्कम 20000 रूपये आहे. SBI मध्ये विविघ योजनांसाठी वेगवेगळे भरणा कालावधी आहे. गोल्ड लोनचे मुलभुत आणि प्रमुख व्याज वितरणाच्या महिण्यापासुन सुरू होईल. लिक्विड गोल्ड लोनसाठी व्यवहार सुविधा आणि मासिक व्याजसह ओव्हरड्राफ्ट खाते ठरवले जाते. बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन स्कीममध्ये कर्जाची परतफेड किंवा खाते बंद होण्यापुर्वी कर्जाची रक्कम जास्त होऊ शकते. SBI गोल्ड आणि लिक्विड गोल्ड लोन दोन्हींची कमाल रिपेमेंट 36 महिन्यांची आहे, तर SBI बुलेट रिपेमेंट गोल्ड लोनचा अवधि 12 महिन्यांचा आहे.


4. अर्जाची प्रक्रिया
कर्ज मंजूर करण्याची आणि रक्कम वितरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. गोल्ड लोनसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.


दोन फोटोसह दोन प्रतींमध्ये गोल्ड लोनसाठी अर्ज.
अॅड्रेस प्रुफ आणि आयडेंटीटी प्रुफ.
निरक्षर कर्जदारांच्या बाबतीत साक्षीदार पत्र.

X