आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय-एलआयसी येस बँकेची ४९% भागीदारी ४९० कोटींत खरेदी करू शकते

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या हिस्सेदारीसाठी सरकारकडून निर्देश मिळाले
  • खासगी क्षेत्रातील बँक सध्या संकटात अडकली

नवी दिल्ली - रोकडटंचाईचा सामना करणाऱ्या येस बँकेला वाचवण्यासाठी सरकारने भारतीय स्टेेट बँके (एसबीआय)ला पुढे केले आहे. सूत्रांनुसार, येस बँकेमध्ये समभाग खरेदीच्या एसबीआयच्या योजनेस सरकारने मंजुरी दिली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.येस बँकेमध्ये हिस्सेदारी खरेदी करणाऱ्या कन्सोर्शियमला एसबीआय लीड करेल. एसबीआय आणि एलआयसी मिळून येस बँकेची ४९% हिस्सेदारी ४९० कोटी रुपयांत खरेदी करू शकते. खासगी क्षेत्रातील येस बँक अडकलेल्या कर्जाच्या समस्येशी तोंड देत आहे. बँक नवे भांडवल जमा करू इच्छित आहे. सध्याच्या संकटामुळे बँकेने डिसेंबर २०१९ च्या तिमाही निकालाची घोषणा लांबणीवर टाकली आहे. नॉन-परफॉर्मिंग अॅसेट(एनपीए)मुळे बँकेचे सुरक्षित भांडवल खालावले आहे. एसबीआयने शेअर बाजाराला दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद केले की, ते सेबी नियमांतर्गत या वेळी घटनाक्रमांचा खुलासा करतील. येस बँकेचे शेअर्स २६% वाढले, एसबीआयचे १%


हे वृत्त आल्यानंतर बीएसईमध्ये गुरुवारी येस बँकेचे समभाग २५.७७% वाढीसह ३६.८५ रुपयावर बंद झाले. व्यवसायादरम्यान त्यांनी २९.३५% वाढीसह ३७.९० रुपयांच्या दिवसाचा नीचांकी स्तर आणि ४.५४% वाढीसह दिवसाचा उच्चांकी स्तर २९८.२५ ला स्पर्श केला. मात्र, नीचांकी स्तरावर खरेदी निघाल्याने सायंकाळी हा १.०५% च्या किरकोळ वृद्धीसह २८८.३० रुपयावर बंद झाला.
 

प्रमोटरची शेअरहोल्डिंग ८.३३ टक्क्यांवर


मंुबई मुख्यालय असलेल्या येस बँकेची स्थापना २००४ मध्ये झाली. जून २०१९ अखेरपर्यंत बँकेचे भांडवल आकार ३,७१,१६० कोटी रु. होता. शेअर बाजारात आकड्यानुसार येस बँकेचे प्रवर्तक मधू कपूर, येस कॅपिटल (इंडिया) प्रा.लि. आणि मिग फिनवेस्टकडे बँकेची ८.३३% हिस्सेदारी आहे. येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूरनी बँकेची पूर्ण हिस्सेदारी विकली आहे. बँकेत एफपीआयची १५.१७% हिस्सेदारी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...