आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय)ने एक वर्षांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लँडिंग रेट(एमसीएलआर)मध्ये 0.10% कपात केली आहे. त्यामुळेच एमसीएलआरशी निगडीत सर्व कर्ज आता स्वस्त होणार आहेत. नवीन दर 10 डिसेंबरपासून लागू केले जातील. एसबीआयचा एक वर्षांचा एमसीएलआर 8% टक्यांवरुन 7.90% झाला आहे. एसबीआयचे बहुतेक कर्ज एक वर्षांच्या एमसीएलआरवर आधारित आहेत.
नवीन ग्राहकांना तात्काळ फायदा मिळेल
टक्यांमध्ये केलेल्या कपातीचा फायदा सर्व ग्राहकांना तात्काळ मिळणार नाहीये, तर हे त्यांच्या रीसेट डेटवर आधारीत आहे. एमसीएलआर आधारित कर्जात रीसेट पिरीअड एक वर्षांचा असतो. म्हणजेच ज्या ग्राहकांची रीसेट डेट 10 डिसेंबर किंवा त्यानंतरची असेल त्यांनाच रेट कटचा फायदा मिळेल, पण रीसेट डेट निघुन गेली असेल तर पुढच्या वेळेस याचा फायदा होईल. 10 डिसेंबर किंवा त्यानंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना एमसीएलआरवर कमी व्याजाचा फायदा मिळेल.
नवीन ग्राहकांसाठी रेपो रेट लिंक कर्जाची व्यवस्था
एसबीआयने चालू आर्थिक वर्षात एमसीएलआर 8 वेळा कमी केला आहे. बँकेचे म्हणने आहे की, होम लोन आणि ऑटो लोनमध्ये त्याचे 25% मार्केट शेअर आहे. आरबीआयच्या निर्देशानंतर एसबीआय एक ऑक्टोबरपासून रेपो रेट आधारित कर्जाची व्यवस्था सुरू केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.