Home | Business | Business Special | SBI Multi Option Deposit Scheme

SBI ची खास स्कीम, अकाऊंटमध्ये झिरो बॅलेन्स असले तरी याठिकाणाहून काढता येईल पैसे, बँकेत जायची गरज नाही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 22, 2018, 08:07 PM IST

विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नसते. ही रक्कम एटीएममधूनच काढता येते.

 • SBI Multi Option Deposit Scheme

  युटिलिटी डेस्क - SBI त्यांच्या ग्राहकांसाठी एफडीशी संबंधित एक खास सुविधा देते. साधारणपणे एफडीमध्ये लॉक इन पिरियज असतो. म्हणजे एका ठरलेल्या तारखेच्या आधी तुम्हाला एफडी मोडता येत नाही. अशा परिस्थितीत अनेकदा पैशांची गरज निर्माण झाल्यानंतर लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता बँकेने या अडचणीवर मात करता येईल एक नवी सुविधा दिली आहे. SBI मल्टी ऑप्शन डिपॉजिट (MOD) ही ती सुविधा. यात तुम्हाला कधीही पैसे काढता येतात.


  काय आहे MOD
  मल्टी ऑप्शन डिपॉझिट (MOD) मध्ये तुम्ही 1 हजाराच्या पटीत अनेकदा पैसे काढू शकता. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याचीही गरज नसते. ही रक्कम एटीएममधूनच काढता येते. हे टर्म डिपॉझिटप्रमाणे असते. अकाऊंट होल्डरच्या सेव्हींग अकाऊंटशी ते लिंक असते. अशा परिस्थितीत ग्राहकाने लिंक केलेल्या अकाऊंटमधून पैसे काढले आणि त्याच्या खात्यात तेवढे पैसे नसले तर असा स्थितीत त्या ग्राहकाला MOD च्या माध्यमातून पैसे काढता येतात.


  किती मिळते व्याज
  एसबीआयच्या एफडीवर जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज एमओडी वरही मिळते. यात तुम्ही मिनिमम 10 हजार रुपये डिझिट करून अकाऊंट सुरू करू शकता. यात जास्तीत जास्त किती रक्कम जमा करावी याची काही मर्यादा नाही. 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी हे अकाऊंट उघडता येते. यावर बँकेकडून लोन घेण्याची सुविधाही मिळते.

Trending