SBI मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 8904 पदांसाठी भरती सुरू; 3 मे आहे शेवटची तारीख

दिव्य मराठी

Apr 25,2019 01:00:00 PM IST

करिअर डेस्क - स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8904 लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यामधील 251 पदे ही वेटिंगची आहेत. ही पदभरती ग्राहक मदत आणि सेल्स विभागात होत आहे. पुढील काही महिन्यात संपूर्ण पदभरती पूर्ण होईल.


कोण करू शकतो अर्ज

> 21 ते 28 दरम्यान वय वर्ष असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.

> एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर ओबीसी आणि पीडब्लुडी उमेदवारांना 3 आणि 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

> या पदासाठी कोणत्याही विषयातील पदवी धारक उमेदवार अर्ज सादर करू शकतो.


अर्ज करण्याची तारीख

> अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे आहे.

> जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रू तर एससी, एसटी आणि पीडब्लुडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 125 रूपये परीक्षा शुल्क द्यावे लागणार आहे.

> लेखी परीक्षद्वारे या पदाची नियुक्ती होणार आहे.

X