Home | Business | Gadget | SBI Replacing old ATM cards to New more safe Cards

SBI कस्टमर्ससाठी आनंदाची बातमी : आता ATM डेबीट कार्डद्वारे होणार नाही फ्रॉड, आले नवे हाय सिक्युरिटी कार्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 09, 2018, 12:04 AM IST

नवीन कार्ड जुन्या मॅजिस्ट्रीप कार्डपेक्षा अधिक सेफ असेल. वारंवार होणाऱ्या फ्रॉडमुळे बँकेने हे पाऊल उचलले आहे.

 • SBI Replacing old ATM cards to New more safe Cards
  देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सेफ्टीसाठी नवीन ATM कार्ड जारी करणार आहे. बँकेने ट्वीट करत याबाबक माहिती दिली की ते EMV चीप असलेले डेबीट कार्ड जारी करत आहेत. नवीन कार्ड जुन्या मॅजिस्ट्रीप कार्डपेक्षा अधिक सेफ असेल. वारंवार होणाऱ्या फ्रॉडमुळे बँकेने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी SBI ने 10 ऑगस्टालाही ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती.
  असे असेल EVM चीप असलेले कार्ड
  EVM चीप असलेल्या डेबीट किंवा क्रेडिट कार्डवर एक लहान चीप लावलेली असेल. त्यात तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती असेल. कोणाला डेटा चोरी करता येऊ नये म्हणून ही माहिती इनक्रिप्टेड असते. EMV चीप कार्डमध्ये ट्रान्झेक्शनदरम्यान यूझरची ओळख पटवण्यासाठी एक युनिक ट्रान्झेक्शन कोड जनरेट होतो, तो व्हेरीफिकेशनला सपोर्ट करतो, सध्याच्या कार्डमध्ये असे होत नाही.
  कनव्हर्जन प्रोसेस असेल सेफ
  बँकेकडून असेही सांगण्यात आले आहे की, डेबीट कार्डचे कनव्हर्जन प्रोसेस पूर्णपणे सेफ आहे. त्यासाठी ग्राहकाला काही अमाऊंटही द्यावी लागणार नाही. ज्यांच्याकडे SBI चे जुने मॅजिस्ट्रीप डेबीट असेल त्यांना ते कार्ड EMV चीप डेबीट कार्डशी 31 डिसेंबर 2018 पर्यंत रिप्लेस करून घेता येईल. 31 डिसेंबरनंतर जुने ATM कार्ड काम करणार नाही. सहा सहकारी बँका एसबीआयमध्ये विलीन झाल्यानंतर बँकेच्या ग्राहकांची संख्या 32 कोटी झाली आहे.
  असे करावे लागेल Apply
  1. नव्या EVM चीप डेबीट कार्डसाठी ऑनलाइन बँकिंगद्वारे किंवा होम ब्रँचमध्ये जाऊन अप्लाय करू शकता.
  2. SBI जुन्या ATM कार्डच्या मोबदल्यात EVM चीप असलेले डेबीट कार्ड घेण्यासाठी काहीही अमाऊंट द्यावे लागणार नाही.
  यामुळे बंद होणार जुने ATM कार्ड
  जुन्या मॅजिस्ट्रीप डेबीट कार्डच्या मागे काळी पट्टी असते. तिला मॅग्नेटिक स्ट्रीप आहे. त्यात तुमच्या बँक अकाऊंटचे डिटेल असते. ATM मध्ये स्वाइप केल्यानंतर तुम्हाला 4 डिजीटचा पिन टाकावा लागतो. त्यानंतरच ट्रान्झेक्शन पूर्ण होते. ही मॅग्नेटिक स्ट्रीप हटवून EVM चीप लावली जाईल. या चीपमध्ये तुमच्या अकाऊंटची पूर्ण डिटेल असेल.

Trending