आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिमम बॅलन्सची सक्ती एसबीआयने मागे घेतली, एफडी व कर्जावरील व्याजदरांतही कपात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने सर्व बचत खातेधारकांसाठी खात्यात किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याचा नियम संपुष्टात आणला आहे. यामुळे अाता सर्व बचत खातेधारकांना झीरो बॅलन्सची सुविधा मिळणार आहे. तसेच बँकेने सर्वच बचत खात्यांवर एकसमान ३ टक्क्यांचा व्याजदर केला आहे. सध्या मेट्रो शहरांतील खातेधारकांना सरासरी ३ हजार रुपये, छोट्या शहरांसाठी २ हजार आणि ग्रामीण खातेधारकांसाठी १ हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवण्याची मर्यादा होती. अन्यथा त्यांना दंड आकारला जात होता. 

एफडी व कर्जावरील व्याजदरांतही कपात 

> एसबीआयने एमसीएलआर ०.१०-०.१५% पर्यंत घटवला. यामुळे एसबीआयचे गृह व वाहन कर्ज स्वस्त झाले आहे. नवीन दर १० मार्चपासून लागू झाले.
> ७ ते ४५ दिवसांच्या ठेवींवर ४% व्याज मिळेल. १ ते ५ वर्षांच्या ठेवींवर ५.९% व्याज मिळेल. ५ ते १० वर्षांच्या एफडीवर ५.९% व्याज मिळेल.बातम्या आणखी आहेत...