आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI एफडीवर देणार कमी व्याज, १ ऑगस्टपासून नवीन दर लागू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच निश्चित ठेव योजनेवरील व्याजदर कमी केले आहेत. कर्जाच्या व्याजदरात झालेली कपात आणि बँकेकडे नगदीची उपलब्धता यामुळे बँकेने हा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार जमेवर मिळणाऱ्या व्याजदरात ५०-७५ आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. दीर्घकाळासाठी जमा करण्यात येत असलेल्या योजनांमध्ये सामान्य ग्राहकांना मिळणाऱ्या व्याजात २० आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. दोन कोटी आणि त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणाऱ्यांनाही आधीच्या तुलनेत कमी व्याज मिळेल. 


एसबीआयनुसार व्याजदरात कपात ४५ दिवसांच्या एफडीपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीपर्यंत करण्यात आली आहे. ४५ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. याआधी ५.७५ टक्क्यांच्या दराने व्याज मिळत होते, ते कमी करून आता पाच टक्के करण्यात आले आहे. ४६ ते १७९ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. 

 

स्टेट बँकेचे जमा ठेव योजनेवरील व्याजदर

कालावधी    जुने दर    नवे दर
7 तेे 45 दिवस    5.75%    5.00%
46 तेे 179 दिवस    6.25%    5.75%
180 ते 210 दिवस    6.35%    6.25%
211 तेे 1 वर्षापेक्षा कमी     6.40%    6.25% 
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी    7.00%    7.00%
2 वर्षापासून ते 3 वर्षांपेक्षा कमी    6.75%    6.70%
3 वर्षापासून ते 5  वर्षांपेक्षा कमी    6.70%    6.60%
5 वर्षापासून तेे 10  वर्षांपर्यंत    6.60%    6.50%

 

२० जुलैपासून बँक ऑफ बडोदाचे नवे दर
कालावधी     व्याज दर
400 दिवसांपेक्षा जास्त व 2 वर्षापर्यंत    6.55%
2 वर्षांपेक्षा जास्त व 3 वर्षांपर्यंत    6.45%
3 वर्षांपेक्षा जास्त व 5 वर्षांपर्यंत    6.45%
5 वर्षांपेक्षा जास्त व 10 वर्षांपर्यंत    6.45%

 

छोट्या वित्तीय संस्थांचे जमा ठेवीवरील दर 

एनबीएफसी    व्याजदर    कालावधी
फिनकेअर     9-9.50%              2 वर्ष 1 दिवस तेे 3 वर्ष 
उत्कर्ष    9-9.50%     456 दिवस <2 वर्ष  
सूर्योदय     8.75%- 9.25%     2 वर्ष ते  3 वर्ष 
नॉर्थ ईस्ट     8.75%-9.25%     555 दिवस

 

वेगवेगळ्या बँकांचे एफडीवरील दर 

बँक    कालावधी    व्याजदर
लक्ष्मी विलास बँक    331-364 दिवस    7.75%
लक्ष्मी विलास बँक    181-330 दिवस    7.65%
इंडस इंड बँक    270 दिवस <1 वर्ष    7.25%
रत्नाकर बँक    241 दिवस <1 वर्ष    7.25%
यस बँक    9 महिने < 1 वर्ष    7.15%
जेअँडके बँक    271 दिवस < 1 वर्ष    7.10%
अॅक्सिस बँक    9 महिने < 1 वर्ष    7.00%
आयडीएफसी बँक    181-365 दिवस    7.00%
बंधन बँक     6 महिने <1 वर्ष    6.80%
इलाहाबाद बँक     333 दिवस    6.75%
यूबीआय    10 तेे 14 महीने    6.75%

 

 

२२ जुलैपासून एचडीएफसी बँकेचे नवे दर

कालावधी    नवे दर
एका वर्षापर्यंत    7.10%
1 वर्ष 17 दिवस ते 2 वर्षांपर्यंत    7.20%
2 वर्षे 17 दिवस ते 3 वर्षांपर्यंत    7.30%
3 वर्षे 1 दिवस तेे 5 वर्षांपर्यंत    7.25%
5 वर्षे 1 दिवस ते 8 वर्षांपर्यंत    7.00%
8 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांपर्यंत    7.00% 

बातम्या आणखी आहेत...