आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - देशातील सर्वात मोठी बँक SBI आता 18 वर्षांखालील मुलांना 'पहला कदम' आणि 'पहली उडान' नावाची बचत खात्यांची सुविधा देत आहे. 'पहला कदम' अंतर्गत कोणत्याही वयाच्या मुलाच्या नावाचे अकाउंट ओपन करू शकता. पण, 10 वर्षाखलील मुलांचे अकाउंट त्यांच्या आई-वडील किंवा गार्डीयनसोबत जॅाइंट असेल. तर 'पहली उडान' मध्ये 10 वर्ष किंवा अधिक वयाची मुले ज्यांना त्यांची स्वाक्षरी करता येते अशा मुलांचे अकांउट त्यांच्या नावाने काढता येते. या खात्यात पर्सनलाइज्ड एटीएमची सुविधाही मिळते. या एटीएमवर त्या मुलाचा फोटो छापलेला असतो.
कोणत्या सुविधा मिळतील?
- दोन्ही प्रकारच्या खात्यात चेक बूक दिले जातात, पण जर त्या खात्यासोबत मोबाइल नंबर रजिस्टर नसेल तर चेक बूक दिले जात नाही. बँकेने या दोन्ही खात्यांसाठी इंक्वायरी राइट्स आणि लिमिटेड ट्रांझेक्शन लिमिटसोबतच इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगची सुविधा पण दिली आहे.
- इंटरनेट बँकिंगचा वापर करून टर्म डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट ओपन केले जाऊ शकते. त्यासोबतच NEFT च्या मदतीने इंटरबँक फंड ट्रांसफर पण करता येते. पण, इंटरनेट बँकिंगमध्ये एका दिवसात 5000 रुपयांपेक्षा जास्त ट्रांझेक्शन करता येणार नाही. मोबाइल बँकिंगचा वापर करून बिल पेमेंट किंवा टॉपअप केले जाऊ शकते. मोबाइल बँकिंगच्या माध्यमातुन दिवसभरातुन 2000 रुपयाचे ट्रांझेक्शन करता येते.
- 'पहला कदम' आणि 'पहली उड़ान' खात्यात एटीएम कम डेबिट कार्डची सुविधा दिली जाते. हे कार्ड तो मुलगा आणि त्याच्या पालकांच्या नवावर इशू होते. एटीएम डेबिट कार्डचा वापर करून एटीएम मशीन किंवा पॅाइंट ऑफ सेल (POS) वर एका दिवसात जास्तीत जास्त 5000 रुपयाचे ट्रांझेक्शन करता येते. या खात्यात मिनिमम बँलेस ठेवण्याची गरत नाही. या खात्यांना झिरो बँलेसवर ओपन करता येते.
- या खात्यात मिळणारे व्याज बचक खात्याइतकेच आहे. या खात्यात नॉमिनीची सुविधा देखील आहे. खाते धारक एसबीआयच्या एका शाखेतुन दुसऱ्या शाखेत अकाउंट ट्रांसफर करू शकातात. या खात्यात ऑटो स्वॅप फॅसिलिटीही दिली जाते. त्यात 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्क्म असेल तर त्याची एफडी केली जाईल.
अकाउंट उघडण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील?
दोन्ही खात्यांसाठी बँकेला केवायसी कागतपत्र द्यावे लागतील. 'पहला कदम' खात्यात मुलाचा जन्म दाखला आणि वडिलांचे आधार आणि पॅन नंबर द्यावे लागतील. पॅन नसेल तर फॉर्म 60 भरावा लागेल. तर 'पहली उड़ान' खात्यात मुलाच्या जन्म दाखल्यासोबत त्याचे आधार आणि पॅन द्यावे लागतील. पॅन नसेल तर फॅार्म 60 भराला लागेल आणि सोबत 1 फोटोपण द्यावा लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.