आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी खरेदी करणार असाल तर एका मिनिटात तपासून घ्या या डिटेल्स, सुप्रीम कोर्टाने दिलाय महत्त्वाचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - सुप्रीम कोर्टाने एका निर्णयात म्हटले आहे की, कोणतीही वाहन निर्माता कंपनी 31 मार्च 2020 नंतर बीएस-4 इंजीन असलेली गाडी विकू शकणार नाही. कोणत्याही बीएस-4 असलेल्या गाड्यांचे रजिस्ट्रेशनही होणार नाही. बीएस-6 उत्सर्जन वाले करणाऱ्या गाड्याच 2020 नंतर विकता येतील. पिछले गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने बीएस-3 वाहनांच्या विक्रीवर बंदी लावली होती. भारत स्टेज उत्सर्जन मानक म्हणजे BSES भारत सरकारने ठरवलेले एक उत्सर्जन मानक आहे. 


बीएस-6 चा फायदा काय 
- केंद्र सरकारने 2016 मध्ये ही घोषणा केली होती की, बीएस-5 मानकांच्या पुढे जात 2020 पर्यंत बीएस-6 मानक लागू केले जातील. बीएस-6 ईंधनमध्ये बीएस-4 च्या तुलनेत सल्फरची मोठ्या प्रमाणावर कमतरता असते. यामुळे प्रदूषणही घटते. 
- उच्च बीएस मानक असलेली वाहने कमी प्रदूषण पसरवतात. सरकारी तेल कंपन्या बीएस-6 ईंधन सप्लायसाठी रिफायनरिंमध्ये 28,000 कोटी रुपये गुंतवतील. 
- वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मदत मिळेल. 
- बीएस-4 इंधनमध्ये सल्फरचे प्रमाण 50 पीपीएम असते. 
- बीएस-6 मध्ये हे प्रमाण 80% घटवून 10 पीपीएमवर येईल. 


प्रदूषण कमी करण्यासाठी उचलले पाऊल 
तज्ज्ञांच्या मते बीएस म्हणजे भारत स्टेज वाहनांचे असे तंत्रज्ञान आहे जे त्यातून निघणारे प्रदूषण कमी करते. त्यावर सारखे काम सुरू असते आणि सलग नवीन स्टेजच्या वाहनांना बाजारात उतरवत जुनी वाहने बंद केली जातात. बीएस-4 वाहनांमधून निघणारा धूर जास्त प्रदूषित असतो आणि अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. तर बीएस-6 वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे जास्त प्रदूषण पसरत नाही. 


असे ओळखा बीएस-4 वाहन 
- तुम्ही जी गाडी खरेदी करत असाल ती बीएस-4 किंवा 6 च्या मानकांवर खरी उतरते की नाही हे समजणे अगदी सोपे आहे. गाडी खरेदी करमातान कंपनीकडून जे बिल दिले जाते, त्यात स्पष्ट लिहिलेले असते की, ती गाडी कोणच्या मानकांनुसार तयारी झाली आहे. 
- मेकर्स क्लाससमोर हे लिहिलेले असेल की, ती वाहन कोणत्या मानकांना पूर्ण करणारे आहे. समजा पल्सर खरेदी केली असे आणि त्यावर लिहिले असेल PULSAR 180 DTS-I BSIII, अशाच प्रकारे इतर वाहनांवरही लिहिलेले असते,  AMAZE 1.5SMT (I-DTEC)
- मारूती सुझुकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्स एक्झ्युक्युटिव्ह (भोपाळ) मनीष इसरानी यांनी सांगितले की, जुन्या वाहनांचे इंजिन कोणत्या मानकांचे आहे हे ऑनलाइनदेखिल चेक करता येते. त्यासाठी तुम्हाला फक्त आरटीओच्या वेबसाइटवर गाडीचा नंबर टाकावा लागतो. नंबर टाकताच पूर्ण डिटेल्स येतात. त्यात इंजीनचा उल्लेखही असतो. 

 

बातम्या आणखी आहेत...