आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • SC Orders Inquiry In Alok Verma Case By CVC And Conducted By Retired SC Judge AK Patnaik

आलोक वर्मा प्रकरणी दक्षता आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या जजच्या निगराणीत दोन आठवड्यांत चौकशी करावी, सुप्रीम कोर्टाचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी मोदी सरकारने त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दक्षता आयोगाला चौकशी करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एके पटनायक यांच्या निगराणीत ही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन आठवड्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच सीबीआयचे प्रभारी संचालक एम नागेश्वर राव फक्त रुटीन काम करतील. ते कोणताही धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस के कौल आणि के एम जोसेफ यांच्या पीठाने वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी केली. 


सुप्रीम कोर्टाने काय म्हटले.. 
>> आलोक वर्माच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने दक्षता आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या निगराणीत चौकशीचे आदेश दिले. दहा दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले. 
>> चौकशीसाठी 10 दिवसांचा कालावधी पुरेसा नसल्याचे सांगत दक्षता आयोगाने दिवाळीनंतर सुनावणीची मागणी केली. 
>> सीबीआयच्या या वादावर आता सुप्रीम कोर्ट दिवाळीच्या सुट्यांनंतर सुनावणी करेल. पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल. 
>> निवृत्त न्यायाधीश यांच्या निगराणीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी. दक्षता आयोगाने ही चौकशी दोन आठवड्यांत करावी. 
>> राकेश अस्थाना यांच्यावरीर कारवाईने फारसा फरक पडत नाही. 
>> आलोक वर्मांची बाजू मांडणारे नरीमन म्हणाले, सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ असा अचानक कमी कसा करता येईल.. 
>> सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, सीबीआयचे प्रभारी संचालक एम नागेश्वर राव कोणताही धोरणात्मक निर्णय घेणार नाहीत. ते रुटीन काम करतील. 
>> केंद्र सरकारने बंद लिफाफ्यात दक्षता आयोगाच्या चौकशीचा अहवाल सादर करावा. 

 

बातम्या आणखी आहेत...