आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा दणका, शपथपत्रात माहिती लपविल्याप्रकरणी हायकोर्टाने दिलेली क्लीनचिट रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शपथपत्र दाखल करताना फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली होती असा आरोप आहे. सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, फडणवीस यांनी त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाकडून लपविली. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाकडून फडणवीस यांना क्लीनचिट मिळाली. परंतु, हायकोर्टाच्या या निकालास उके यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा हा निकाल समोर आला आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने सर्वच पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या. तसेच निकाल राखीव ठेवला होता.