आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग.स. बँकेला साडेपाच काेटींचा गंडा; ४४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- धुळे, नंदुरबारसह जळगावमध्ये विस्तार असलेली ग. स. बँक प्रत्यक्षात तोट्यात असताना नफ्यात दाखवली. त्यासाठी बनावट कागदपत्रे व आर्थिक पत्रकांचा आधार घेतला. संचालक, सभासदांच्या बैठकीतही खोटी माहिती सादर करण्यात आली. तसेच एटीएमबद्दल रिझर्व्ह बँकेने परवानगी नाकारली तरी नाशिकच्या कंपनीला नियमबाह्य ठेका देण्यात आला. या दोन्ही प्रक्रियांतून बँकेला साडेपाच कोटींचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ४४ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची बँक अर्थात ग. स. बँकेने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप होता. याबाबत सहकार विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. चौकशीअंती या तक्रारींमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे शासनातर्फे वसंत प्रभाकर राठोड यांनी तक्रार दिली आहे. बँकेचे संचालक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमत करून बँक तोट्यात असताना नफ्यात आहे, अशी खोटी कागदपत्रे तयार केली. प्रत्यक्षात कर्जावरील व्याज वसूल झाले नसताना पदाधिकारी, संचालक व इतरांनी बँक तब्बल चार कोटी ४४ लाख ५३ हजार २०५ रुपये उत्पन्न अर्थात नफा मिळाल्याचे दर्शवत बँकेची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...